Britain_PM_Boris_Johnson 
ग्लोबल

एक्स-गर्लफ्रेंडच्या आरोपानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांची चौकशी; अश्लील फोटो पाठवत होते जॉन्सन

वृत्तसंस्था

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका अमेरिकेतील उद्योजक महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जॉन्सन यांच्या लग्नानंतरही त्यांनी तिच्याशी अनेकदा शारीरिक संबंध ठेवले होते. 

जेनिफर अर्करी असं या उद्योजिकेचं नाव आहे. जेनिफर ही जॉन्सन यांच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान आहे. जेनिफरच्या आरोपानंतर या प्रकरणी जॉन्सन यांची चौकशी सुरू झाली आहे. २०१२ ते २०१६ या दरम्यान जेनिफर आणि जॉन्सन हे एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी जॉन्सन हे लंडनचे महापौर होते. तसेच त्यांचे मरिना व्हीलरशी लग्न झाले होते. 

'द मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने म्हटले आहे की, मी ज्या व्यक्तीस ओळखत होते, तो सध्या अस्तित्वातच नाही. २०१९मध्ये जेव्हा दोघांमधील नातं जगासमोर आलं तेव्हा जॉन्सन यांनी काहीही मदत केली नाही, असा आरोप जेनिफरने केला आहे. 

जेनिफर पुढे म्हणाली की, २०११मध्ये एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. आणि २०१२ मध्ये होणाऱ्या महापौरपदाच्या पोटनिवडणुकीत वॉलंटियर म्हणून काम केले होते. लंडनमधील त्यांच्या फ्लॅटमध्येच दोघांनी लैंगिक संबंध ठेवले होते. शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या ते एकमेकांकडे आकर्षित झाले होते. 

लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये जॉन्सन यांनी डेट करण्याबाबत विचारणा केली होती. २०१२च्या लंडन पॅरालिंपिक स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी शोरेडिट फ्लॅटमध्ये जॉन्सन यांच्यासोबत लैंगिक संबंध केल्याचे जेनिफरने म्हटले आहे. ते एकमेकांना अश्लिल फोटो पाठवायचे तसेच जॉन्सन ड्युटीवर असतानाही अशा प्रकारचे फोटो पाठवायचे. जेनिफर जॉन्सन यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती त्यामुळे तिने तिचे टॉपलेस फोटो पाठवले होते. आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहायचो, तिथे डान्स पोलसुद्धा होता, असंही जेनिफरने म्हटले आहे.  

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT