burj-khalifa 
ग्लोबल

बुर्ज खलिफा बनली जगातील सर्वांत उंच दानपेटी; कशी ते वाचा सविस्तर

पीटीआय

दुबई - जगातील सर्वांत उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणारी दुबईमधील बुर्ज खलिफा आता जगातील सर्वांत उंच दानपेटी बनली आहे. संयुक्त अरब अमिरातीला (यूएई)  कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला असून येथेही अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रमजानच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशातील अल्प उत्पन्न गटातील १०  दशलक्ष लोकांना जेवण मिळावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उपक्रम नेमका काय? 
बुर्ज खलिफावर दहा लाखांपेक्षाही अधिक दिवे आहेत. एखाद्या व्यक्तीने गरजूला मदत म्हणून १० दिरहम  (२.७ डॉलर ) एवढी रक्कम दान केली तर त्या दानाचे एक प्रतिक म्हणून या इमारतीवरील एक एलईडी दिवा प्रज्वलित करण्यात येईल, टप्याटप्याने दान वाढत जाईल तसे अनेक दिवे प्रज्वलित करण्यात येतील.   

लोकांचा प्रतिसाद 
या आवाहनाला २४ तासांचा अवधी उलटत नाही तोच लोकांनी दान करायला सुरवात केली. आतापर्यंत  एक लाख ७६ हजार लोकांनी दान केल्याचे इमारतीवर प्रज्वलित झालेल्या दिव्यावरून दिसून येते. याआधी देखील ऑस्ट्रेलियामध्ये बुशफायरचा भडका उडाल्यानंतर आणि चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर बुर्ज खलिफावर अशाच पद्धतीने रोषणाई करण्यात आली होती. सध्या यूएईमध्ये ही कोरोनाने धुमाकूळ घातला असून येथे १४ हजारांपेक्षाही अधिक लोकांना बाधा झाली असून १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT