Canada accused India of potential interference in the country election
Canada accused India of potential interference in the country election 
ग्लोबल

Canada-India: भारताने देशाच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केला; कॅनडाच्या गुप्तचर रिपोर्टमधून दावा

कार्तिक पुजारी

ओटावा- कॅनडाच्या गुप्तचर सुरक्षा युनिटने भारतावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. कॅनडाच्या परराष्ट्र गुप्तचर एजेन्सीने आरोप केलाय की, कॅनडाच्या निवडणुकीमध्ये भारत सरकारने सक्रीयपणे हस्तक्षेप केला आहे. गुप्तचर रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.(Canada top foreign intelligence agency has accused India of potential interference in the country election )

'परराष्ट्र हस्तक्षेप धोका' नावाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, भारताकडून निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्यात येत आहे. त्यामुळे कॅनडियन सरकारने यापुढे अधिक तत्परतेने देशाची मजबूत लोकशाही व्यवस्था आणि प्रक्रिया यांचे संरक्षण करायला हवे. कॅनडियन मीडिया ग्लोबल न्यूजने दावा केलाय की, जर लवकरच काही पाऊलं उचलली नाहीत तर भारत अधिक सक्षमपणे हस्तक्षेप करु लागेल.

कॅनडाने पहिल्यांदाच भारतावर निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. कॅनडाने याआधी चीन आणि रशियाने राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. आता नव्याने भारतावर आरोप करण्यात आले आहे. आधीच भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले आहेत. या ताज्या आरोपांमुळे दोन्ही देश आणखी दूर जाणार आहेत.

कॅनडियन गुप्तचर एजेन्सीचा २४ फेब्रुवारी २०२३ चा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये चीनपासून सर्वाधिक धोका असल्याचं म्हटलं आहे. रिपोर्टमध्ये भारत आणि चीन यांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

जस्टिन ट्रुडो यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये गंभीर आरोप केला होता. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची हत्या भारतीय गुप्तचर यंत्रणेने केला होता, असा दावा त्यांनी केला होता. भारताने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र, या आरोपानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT