Canada 
ग्लोबल

मुस्लिम द्वेषातून ट्रक चालकाने कुटुंबातील 4 जणांना चिरडले

कार्तिक पुजारी

एका ट्रक चालकाने मुस्लिम कुटुंबातील 4 सदस्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण कॅनडातील ओटारिओ प्रांतातील हा प्रकार आहे.

ओटावा- एका ट्रक चालकाने मुस्लिम कुटुंबातील 4 सदस्यांची हत्या (Canada Truck Driver Kills Muslim Family) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दक्षिण कॅनडातील ओटारिओ प्रांतातील हा प्रकार आहे. हत्या पूर्वनियोजित असून ती मुस्लिम द्वेषातून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 20 वर्षीय आरोपीने हल्ल्यानंतर घटनास्थळापासून पळ काढला. पण, सात किलोमीटरच्या अंतरावर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिस अधिकारी पॉल वेट यांनी यांसदर्भातील माहिती दिली आहे. (Canada Truck Driver Kills Muslim Family Of 4 In Hate Attack)

हल्ला नियोजनबद्ध आणि पूर्वनियोजित होता हे पुराव्यांवरुन स्पष्ट होतंय. तसेच हल्ला द्वेषातून प्रेरित होता. पीडितांवर हल्ला करण्यात आला कारण ते मुस्लिम होते, असंही पॉल यांनी सांगितलं. मृतांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. पण, एक 77 वर्षीय महिला, 46 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय महिला आणि एका 15 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. तिन्ही महिला एकाच कुटुंबातील असून त्या तीन पिढ्यांचं प्रतिनिधित्व करत होत्या. हल्ल्यानंतर एका 9 वर्षीय मुलालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील पाच सदस्य फिरण्यासाठी बाहेर पडले होते. ते फूटपाथवरुन चालत होते. त्यावेळी एका पीक अप ट्रकने त्यांना चिरडले. आरोपींला अटक करण्यात आली असून हत्या आणि हत्येचा प्रयत्न कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटचा तपास करत आहेत.

दरम्यान, या हल्ल्याने अनेक जुन्या घटनांची आठवण करुन दिली. जानेवारी 2017 मध्ये Quebec City मध्ये हल्लेखोराने गोळीबार केला होता. ज्यात सहा लोकांचा मृत्यू झाला होता. 2018 मध्ये अशाच एका माथेफिरुने लोकांना ट्रकच्या मदतीने चिरडले होते, ज्यात 10 जणांचा जीव गेला होता. मार्च 2019 मध्ये न्यूझीलँडमध्ये मशिदीत गोळीबार झाला होता. पश्चिमेत मुस्लिमांवर झालेला हा सर्वात वाईट हल्ला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT