moon 
ग्लोबल

होय, चंद्रावर आहे पाणी! शास्त्रज्ञांना मिळाला पहिला थेट पुरावा

सकाळ डिजिटल टीम

बीजिंग : पृथ्वी सोडून इतर कोणत्या ठिकाणी पाणी आहे का? याबाबतचं कुतुहल सातत्याने व्यक्त केलं जातं. इतर ठिकाणी पाणी असेल तर त्या ठिकाणी जीवसृष्टी असण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, आता पृथ्वी सोडून इतर ठिकाणी पाणी आहे का, याचा शोध संपुष्टात आला आहे. चीनच्या (China) ‘चँग ५’ या या चंद्रावर उतरलेल्या लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी (water on moon) असल्याचा पहिला थेट पुरावा सापडला आहे. यामुळे चंद्राबाबतच्या संशोधनाला बळ मिळाले आहे.

याबाबतचा अभ्यास ‘सायन्स’ या नियतकालिकात दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे. यानुसार, चंद्रावर चीनचे ‘चँग ५’ हे लँडर ज्या ठिकाणी उतरले, त्या ठिकाणच्या मातीच्या नमुन्यात पाण्याचा अंश आढळला असल्याचे ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. यानुसार, या मातीमध्ये प्रतिटन १२० ग्रॅम पाणी आढळले. पृथ्वीच्या तुलनेत हे प्रमाण अत्यंत कमी आहे. खडकांच्या नमुन्यांतही पाण्याचा अंश आढळून आला आहे. सौर वाऱ्यांमुळे चंद्रावर आर्द्रता वाढते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

चीनचे चँग-५ हे अवकाशयान चंद्रावरील सर्वांत कमी आयुर्मान असलेल्या एका बेसाल्ट खडकावर उतरविण्यात आले आहे. या यानाने १,७३१ ग्रॅम वजनाचे मातीचे नमुने पृथ्वीवर पाठवले आहेत. यान ज्याठिकाणी उतरले त्याच ठिकाणी पाण्याचे पुरावे सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT