कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना काँग्रेसचे 20 वे अधिवेशन संपल्यानंतर शी जिनपिंग यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. सलग तिसऱ्यांदा पक्षाच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. चीनमध्ये, या पदासाठी निवडलेला नेता देशाचा राष्ट्रपती असतो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) चा कमांडर देखील असतो. (China President Xi Jinping Secures Third Term As Communist Party General Secretary And President)
जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्याने पक्षाची तीन दशके जुनी राजवटही मोडीत निघाली आहे. चीनमध्ये 1980 नंतर सर्वोच्च पदावर 10 वर्षांच्या कार्यकाळाचा नियम करण्यात आला. मात्र, जिनपिंग यांना आणखी पाच वर्षे सत्तेवर ठेवण्यासाठी हा नियम बाजूला ठेवण्यात आला.
चीनच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अध्यक्षाला तिसऱ्यांदा या पदावर कायम राहता येणार आहे. यावेळी २०५ सदस्यांची पक्षाची मध्यवर्ती समितीही जाहीर झाली. पक्षानं या समितीतून प्रधानमंत्री ली केकियांग, उपप्रधानमंत्री हान झेंग यांच्यासह इतर दोघांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं याना सरकारमध्ये महत्त्वाचं पद यापुढं भुषवता येणार नाही.
शी जिनपिंग यांनी तिसऱ्यांदा विक्रम मोडत चीनचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून पदभार स्वीकारला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना या सर्वात शक्तिशाली पक्षाच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली आहे. चीनमधील सत्तेची चावी कम्युनिस्ट पक्षाच्या हातात आहे. हा पक्ष चिनी सैन्याचेही नेतृत्व करतो.
ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये पक्षाच्या आठवडाभर चाललेल्या 20 व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी रविवारी कम्युनिस्ट पक्षाच्या सरचिटणीसपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी शी जिनपिंग यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. "तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी संपूर्ण पक्षाचे मनापासून आभार मानू इच्छितो." असं जिनपिंग म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.