ग्लोबल

चीनमधून आणखी एक धोका; बर्ड फ्लूच्या नव्या स्ट्रेनची मानवाला लागण

विनायक होगाडे

बीजिंग : चीनच्या जियांगसू प्रांतात आता बर्ड फ्लूच्या मानवी संसर्गाची नोंद झालेली आहे. एका माणसामध्ये H10N3 विषाणूच संसर्ग आढळला आहे. याबाबतची माहिती चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने आज मंगळवारी दिली आहे. H10N3 हा बर्ड फ्लूचा स्ट्रेन माणसांत सापडला आहे. बर्ड फ्लू अथवा ज्याला एव्हीयन इन्फ्लूएंझा असं म्हटलं जातं हा रोग बहुतांश वेळेला पक्ष्यांमध्ये आढळतो. मात्र, इतर प्राणी तसेच माणसांना संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूमध्ये निश्चितच आहे. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मारणाऱ्या विषाणूचा H5N1 हा स्ट्रेन कॉमन आहे. मात्र, आता या विषाणूचा हा नवा स्ट्रेन सापडला आहे. या विषाणूचा नवा H10N3 स्ट्रेन माणसांत सापडणं हे चिंताजनक मानलं जात आहे.

झेंजियांग या पूर्व भागातील शहरामध्ये एका 41 वर्षीय पुरुषाला या विषाणूचं संक्रमण झालं आहे. पोल्ट्रीमधून हे संक्रमण या माणसाला झालं असल्याचं आढळून आलं आहे. मात्र, मोठ्या संख्येने हा विषाणू पसरण्याचा धोका कमी असल्याचं हेल्थ कमिशनच्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे चीनच्या हेल्थ कमिशननेच सांगितलंय की, यापूर्वी जगात कधीच H10N3 च्या मानवी संसर्गाची नोंद झालेली नाही.

काय आहे हा बर्ड फ्लू?
बर्ड फ्लू अथवा ज्याला एव्हीयन इन्फ्लूएंझा असं म्हटलं जातं हा रोग बहुतांश वेळेला पक्ष्यांमध्ये आढळतो. मात्र, इतर प्राणी तसेच माणसांना संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूमध्ये निश्चितच आहे. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मारणाऱ्या विषाणूचा H5N1 हा स्ट्रेन कॉमन आहे. अर्थातच कोरोनामुळे आता तुम्हाला विषाणू, त्याचा स्ट्रेन, त्याचा प्रकार या सामान्य बाबी आता समजल्याच असतील. जसा कोरोनाचा नवा स्ट्रेन सध्या धुमाकूळ घालतो आहे, अगदी तसेच बर्ड फ्लूच्या विषाणूचे देखील इतर अनेक स्ट्रेन आहेत. जसे की H5N7 आणि H5N8 असे... आणि हेदेखील संसर्गजन्य तसेच जीवघेणे आहेत... हा व्हायरस सर्वांत आधी गीस या पक्ष्यामध्ये आढळला... तो सुद्धा चीनमध्ये... चीन ही विषाणूंची जननी आहे.. असं छातीठोकपणे म्हणायला आता काही हरकतच उरली नाहीये... आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा विषाणू आणि हा रोग जगभरात सापडत गेला. भारतामध्ये हा विषाणू पहिल्यांदा महाराष्ट्रात सापडला होता. 2006 मध्ये नंदूरबारमध्ये याची पक्ष्यांना लागण झाली होती. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये आढळलेल्या पक्ष्यांच्या शरिरामध्ये H5N8 हा स्ट्रेन सापडला आहे तर हिमाचल प्रदेशातील पक्ष्यांच्या चाचणीमध्ये H5N1 हा विषाणू सापडला आहे.

कसा आणि कुठून आला बर्ड फ्लू? भारतात काय आहे धोका?

माणसांमध्ये संक्रमण शक्यय का?
बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांच्या संपर्कातून माणसांमध्ये प्रवेश करु शकतो. जगात याप्रकारची केस सर्वांत आधी अर्थातच चीनमध्ये आढळली होती. 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये बर्ड फ्लूने संक्रमित पहिला माणूस सापडला होता. हा पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारा कामगार होता, ज्याला पक्ष्यांच्या संपर्कामुळे हा संसर्ग झाला होता.
हा विषाणू माणसांसाठी धोकादायक आहे का? तर हो, आहे. माणसांमध्ये या विषाणूच्या संक्रमणामुळे होणारा जास्तीतजास्त मृत्यूदर हा 60 टक्क्यांइतका आहे. आणि म्हणूनच हे चिंतेचे कारण आहे. या विषाणूच्या सध्याच्या स्वरुपामध्ये तरी माणसांकडून माणसांकडे याचे संक्रमण होण्याबाबत कसलीही उदाहरणे आढळली नसल्याने त्याबाबत माहिती नाहीये. म्हणजे ज्यांनी पक्ष्यांशी संपर्क केला आहे अथवा जे अनावधानाने पक्ष्यांच्या संपर्कात आलेत, त्यांनाच हा संसर्ग झाल्याचे सध्यातरी आढळले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT