Russia And China  esakal
ग्लोबल

रशिया आमचा महत्त्वाचा भागीदार; चीनकडून समर्थन

रशिया हा चीनचा सर्वांत महत्त्वाचा व्यूहात्मक भागीदार देश असल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी आज स्पष्ट केले.

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : रशिया हा चीनचा सर्वांत महत्त्वाचा व्यूहात्मक भागीदार देश असल्याचे चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी आज स्पष्ट केले. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर अनेक देश रशियावर निर्बंध घालत असताना चीन मात्र ठामपणे रशियाच्या साथीला उभा राहिला आहे.

रशियावर निर्बंध घालण्याच्या पाश्‍चिमात्य देशांच्या निर्णयाला चीनने विरोध केला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना वँग यी म्हणाले की,‘‘निर्बंध घातल्याने नवीन समस्या निर्माण होतात. आम्ही रशियावर निर्बंध घालणार नाहीत. तो देश आमचा सर्वांत महत्त्वाचा व्यूहात्मक भागीदार देश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही कठिण परिस्थिती निर्माण झाली तरीही चीन आणि रशिया यांची भागीदारी कायम राहिल.’’ रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर संयुक्त राष्ट्र आणि सुरक्षा समितीमध्ये मांडल्या गेलेल्या सर्व ठरावांवेळी चीनने तटस्थ भूमिका स्वीकारली होती.

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी यांची चार फेब्रुवारीला भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत दृढ संबंधांवर शिक्कामोर्तब केले होते. तैवान हा चीनचाच भाग असल्याच्या चीन सरकारच्या दाव्याचे रशियाने समर्थन केले आहे. तर, चीनने ही ‘नाटो’ संघटनेचा विस्तार होऊन त्यात युक्रेन आणि पूर्व युरोपातील इतर काही देशांचा त्यात समावेश करण्यास विरोध दर्शविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : 100 मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

Pune Politics: मंचरमध्ये ठाकरे गटाचा एल्गार! गद्दारीच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून आंदोलन; 'निष्ठावंतांच्या बळावरच शिवसेना मजबूत'

School Chalo Abhiyan: शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांचे औक्षणाने स्वागत, ताटात खीर-हलवा; ‘स्कूल चलो अभियान 2.0’ची खास सुरुवात

Mathura Pedha : मथुरेत गेलात आणि हा पेढा खाल्ला नाही? कृष्णाला प्रिय असलेली मिठाई कशी बनते ? जाणून घ्या ४०० वर्षांचा इतिहास

SCROLL FOR NEXT