india_china 
ग्लोबल

भारतीयांनो तुम्हाला आमच्या देशात येऊ देतो, पण..; चीन सरकारने घातली अशक्य अट

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : भारतासहित जगातील एकूण 20 देशांतील लोक जे चीनमध्ये परतू इच्छित आहेत, त्यांना चीनद्वारे तयार केलेली कोरोना लस घेणे अनिवार्य असणार आहे. नवी दिल्लीमधील चीनी दुतावासाने एका सुचनेद्वारे हे जाहीर केलंय की, ही लस घेण्याबरोबरच त्या व्यक्तीकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र 'ग्लोबल टाइम्स'च्या एका वृत्तानुसार याप्रकारची नोटीस 20 देशांमधील चीनी दुतावासांमध्ये देण्यात आली आहे. 

चीनच्या या निर्णयानंतर सर्वांत मोठी अडचण ही आहे की, भारतात चीनद्वारे निर्माण केलेली कोणतीही लस उपलब्ध नाहीये. चीनच्या दुतावासाने मात्र अद्यापही हे स्पष्ट केलं नाहीये की, भारतात चीनची लस उपलब्ध नाहीये तर ती लोकांना कशी मिळवता येईल? एका रिपोर्टनुसार, 23 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील अधिकतर मेडीकलचे विद्यार्थी आहेत . तसेच अनेक लोक नोकरदार आहेत, जे चीनमध्ये काम करतात. कोरोना महासंकटामुळे हे लोक मोठ्या काळापासून आपल्याच देशात आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान यांनी सांगितलं की सुरक्षेच्या कारणास्तव चीनने हा निर्णय घेतलाय की आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या प्रवासाला सुरवात केली जाऊ शकते. 

चीनमध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांनी चीनचीच लस घेतलली असणे अनिवार्य करणे, या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. तसेच यामध्ये लसीच्या उपलब्धतेवरच प्रश्नचिन्ह असल्याने हा निर्णय अंतर्विरोधी ठरतोय. या निर्णयावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका देखील केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT