China  sakal
ग्लोबल

China : चीन खोदणार दहा हजार मीटर खोल छिद्र

खनिजे आणि भूगर्भाचा अभ्यास करण्यासाठी प्रकल्प हाती घेतल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : चीनचे शास्त्रज्ञ जमिनीखाली सुमारे दहा हजार मीटर अर्थात ३२ हजार ८०८ फूट खोल छिद्र पाडत असल्याची माहिती मंगळवारी शिन्हुआ या सरकारी वृत्त संस्थेने दिली. चीनमधील खनिज तेलाने समृद्ध असलेल्या शिंजियांग प्रांतामध्ये हे छिद्र पाडण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

चीनच्या अभियांत्रिकी अकादमीचे शास्त्रज्ञ सन जिनशेंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीखालील पाषाणाचे सुमारे दहा थर छेदून हे छिद्र पाडले जाणार आहे. हे काम म्हणजे, स्टीलच्या अत्यंत पातळ तारेवरून ट्रक चालविण्या इतके जिकिरीचे असल्याचा दावा जिनशेंग यांनी केला आहे.

हा प्रयोग यशस्वी झाल्यास सुमारे १४५ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या क्रेटेशियस थरांपर्यंत हे छिद्र पोहोचणार असून यातून पृथ्वीशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचा दावा चीनने केला आहे. त्याचप्रमाणे खनिजे आणि भूगर्भातील हालचालींची माहिती मिळण्यासाठी देखील या प्रयोगाचा उपयोग होणार असल्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपींज यांनी चीनमधील शास्त्रज्ञांना २०२१मध्ये भूगर्भाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आल्याचे मानले जात आहे.

प्रयोग यशस्वी झाला तर...

रशियाने देखील १९८९ मध्ये अशाच पद्धतीचे जमिनीखाली सुमारे सव्वा बारा हजार मीटर अर्थात ४० हजार २३० फूट छिद्र पाडले होते. चीन जर या प्रयोगात यशस्वी झाला तर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे छिद्र ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT