China India Border Issues sakal
ग्लोबल

China India Border Issues : चीनच्या उदयाचे देशासमोरआव्हान : सरसेनाध्यक्ष

‘‘चीनबरोबरील न सुटलेला सीमावाद आणि त्या देशाचे वाढते वर्चस्व हे नजीकच्या भविष्यात भारत आणि भारतीय लष्करासमोरील सर्वांत मोठे आव्हान असेल,’’ असे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी आज सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘चीनबरोबरील न सुटलेला सीमावाद आणि त्या देशाचे वाढते वर्चस्व हे नजीकच्या भविष्यात भारत आणि भारतीय लष्करासमोरील सर्वांत मोठे आव्हान असेल,’’ असे सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान यांनी आज सांगितले. पुण्यात झालेल्या ‘चीनचा उदय आणि त्याचे जगावर होणारे परिणाम’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

जनरल चौहान म्हणाले,‘‘भारत आणि चीन सीमेशी संबंधित सर्व संघर्षबिंदूंवर चिनी सैनिकांना ठामपणे हाताळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताचे आपल्या शेजारी देशांबरोबर सीमावाद आहेत आणि त्यातूनच प्रत्यक्ष नियंत्रण रेषा, ताबा रेषा आणि प्रत्यक्ष ताबा रेषा असे शब्द तयार झाले आहेत. चीनचा उदय आणि सीमावाद यांचे भारतासमोर आव्हान असेल. वाद असलेल्या सीमांच्या आणि प्रदेशांच्या बाबतीत भारताला आपल्या भूमिकेवर ठाम राहावे लागेल आणि निर्धाराने आपली बाजू मांडावी लागेल, तसेच दोन्ही देश कराराच्या चौकटीतच सर्व कार्यवाही करतील, याकडेही लक्ष द्यावे लागेल.’’

चीनचा खोडसाळपणा

नव्यानेच काही दावे करणे, जागांची नावे बदलणे, सीमेवरील सैन्याची हालचाल वाढविणे, अशा गोष्टी करण्याची चीनची सवय असल्याचे सरसेनाध्यक्षांनी या वेळी सांगितले. ‘‘चीनच्या अशा क्लृप्त्यांचा सर्व पातळ्यांवर एकत्रितपणे सामना करणे आवश्‍यक आहे. यामध्ये विचारवंत, धोरणकर्ते, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती या सर्वांचाच सहभाग गरजेचा आहे. समतोल साधण्यासाठी इतर देशांचीही एकजूट आवश्‍यक आहे,’’ असे जनरल चौहान यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: गौतम गंभीर काय करतोय, माहित नाही; शुभमन गिलसोबतही असंच केलं..., विश्वविजेता खेळाडू भडकला

Double Decker Bus Accident : भीषण दुर्घटना! डबलडेकर बस उलटली; पाच जणांचा मृत्यू ,१६ जण गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : ओडिशातील कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

Weather Update: दिवसा उन्हाचे चटके, रात्री बोचरा उकाडा; तापमान बदलामुळे सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले

Manchar News : आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाला ‘वसंतराव काणे आदर्श’ पुरस्कार

SCROLL FOR NEXT