ग्लोबल

'त्या' थपड्डीचा झाला फायदाच! स्टँड-अप कॉमेडी करणारा ख्रिस मालामाल

सकाळ डिजिटल टीम

काल ऑस्करच्या 94 व्या अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मात्र, हा सोहळा गाजला आहे तो वेगळ्याच कारणांनी... या सोहळ्याचे निवेदन करणारा कॉमेडियन ख्रिस रॉक याला अभिनेता विल स्मिथने (Will Smith) मंचावर जाऊन थप्पड मारली होती. विल स्मिथला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, या थप्पडीचा ख्रिस रॉकला (Chris Rock) फायदाच झाला असल्याचं दिसून येतंय कारण, त्याचा आगामी कॉमेडी शो सध्या तुफान हाऊसफुल्ल झाला आहे. त्याच्या आगामी स्टँड-अप शोसाठीच्या तिकीट विक्रीमध्ये विक्रमी वाढ होत आहे.

व्हरायटी, टिकपिक या दुय्यम तिकीट विक्री करणाऱ्या कंपन्यांनी काल ही घटना घडल्यानंतर गेल्या एका महिन्यात जेवढी तिकीट विक्री केली नाही, तेवढी विक्री काल एका दिवसांत केली आहे. कंपनीने दावा केला आहे की रविवारी रात्रीपासून तिकिटांच्या किमतीही वाढल्या आहेत. 18 मार्चला 46 डॉलर असणारी तिकीटाची किंमत आज 341 डॉलरवर जाऊन पोहोचली आहे. रॉक विल्बर थिएटरमध्ये बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी बॅक टू बॅक शो सादर करणार आहे.

काल सोहळ्यात नेमकं काय घडलं?

विल स्मिथला यावर्षी ‘किंग रिचर्ड’साठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. त्यावेळी त्याने विल स्मिथच्या पत्नीवर एक विनोद केला. त्यानंतर विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारल्याचं दिसून आलं. कॉमेडियन क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली होती, जी त्याला आवडली नाही. मात्र, त्यानंतर विल स्मिथने घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT