ग्लोबल

Iran–Israel conflict : ''...तर आम्ही अणुधोरण बदलू'' इराणचा इस्राईलवर अणुहल्ला करण्याचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

तेहरान : ‘आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास आम्ही आमचे अणुधोरण बदलू,’ असे म्हणत इराणने आज इस्राईलवर अणुहल्ला करण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिला. इराणच्या या इशाऱ्यामुळे पश्‍चिम आशियातील आधीपासूनच असलेल्या संघर्षग्रस्त वातावरणातील तणाव वाढला आहे.

इराण आणि इस्राईल या देशांनी एकमेकांवर एकमेकांवर थेट हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमधील शत्रुत्वाला आणखी धार आली आहे. केवळ शांततेसाठी अणुशक्तीचा वापर करण्याचे इराणचे धोरण आहे.

त्याच अटीवर त्यांच्यावरील अनेक निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र, इस्राईल-हमास युद्धापासून तणाव वाढला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे सल्लागार कमाल खाराझी यांनी रविवारी एका वाहिनीला मुलाखत देताना अणुधोरण बदलण्याचा इशारा दिला.

ते म्हणाले,‘‘अणुबाँब तयार करण्याबाबत आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र, आमच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाल्यास तसा निर्णय घेण्याशिवाय गत्यंतर उरणार नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI ची मोठी घोषणा! WPL 2027 च्या तारखा जाहीर; २८ ऑक्टोबरला ऑक्शन, फ्रँचायझीला या महिन्याची दिलीय डेडलाईन, नेमकं काय?

Road Development : धनंजय मुंडेंच्या मागणीला यश! लोखंडी सावरगाव-बर्दापूर फाटा रस्ता होणार चौपदरी; १०४.४९ कोटींच्या कामाची निविदा प्रसिद्ध

Saudi Arabia Drone Attack : मुस्लिमांसाठी पवित्र मक्कावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न ; सौदीने हवेतच केले नष्ट, भारताने व्यक्त केली चिंता

Gangapur News : शिक्षकांची बंद केलेली वेतनवाढ आदेश त्वरित रद्द करावा; आमदार सतीश चव्हाण यांची मागणी

Nagpur News : सहकाराचा गाडा रुळावरून घसरला! दहा वर्षांत आठ सहकारी पतसंस्था डबघाईस, २२ संस्था अवसायनात; मौद्यात सहकार संकटात

SCROLL FOR NEXT