corona  Sakal
ग्लोबल

तिसऱ्या लाटेपासून वाचलेल्या देशांत कोरोना

दक्षिण कोरिया नवीन हॉटस्पॉट; जर्मनीतही दररोज दोन लाख रुग्णांना लागण

सकाळ वृत्तसेवा

सोल/ बर्लिन : जगभरात कोरोना संसर्गाचा प्रसार पुन्हा होऊ लागला आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या लाटेपासून वाचलेले देश आता या संसर्गाच्या तडाख्यात सापडत आहेत. अनेकांना लागण होत असून मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे.

भारतीय उपखंडात कोरोनाची लाट कमी झालेली असताना तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव न झालेल्या देशांत कोरोनाची लागण होत आहे. यात दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, जपान यासारख्या देशांचा समावेश आहे. सध्या जगात दरररोज सरासरी ११ ते १४ लाख रुग्ण आढळून येत असून तीन ते चार हजार जणांचा मृत्यू होत आहे. सर्वाधिक बिकट स्थिती दक्षिण कोरियाची असून तेथे गेल्या चार दिवसांपासून दररोज दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जर्मनी आणि तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स आणि चौथ्या क्रमांकावर इटली आहे.

जर्मनीत देखील दररोज दोन लाख जणांना लागण होत आहेत. फ्रान्समध्ये १.५० लाख ते १.७० लाख , इटलीत ६० ते ८० हजार जणांना लागण होत आहे. ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर असून तेथे दररोज ५० ते ७० हजार रुग्ण आढळून येत आहेत. दक्षिण कोरिया आता कोरोनाचा नवीन हॉटस्पॉट बनला आहे. या ठिकाणी आतापर्यंत सुमारे १.४९ कोटी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी १८,७५४ जणांचा मृत्यू झाला आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर जर्मनी, फ्रान्स, व्हिएतनाम, थशयलंडमधील स्थिती देखील बिघडत चालली आहे.

जगात आतापर्यंत ४९ कोटी बाधित

जगभरात आतापर्यंत ४९.६६ कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात ६१.९५ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. ४३.२३ कोटी लोक बरे झाले असून अजूनही ५.८१ कोटी रुग्ण बाधित आहेत. भारतात ४.२३० कोटी लोकांना लागण झाली असून त्यापैकी ४.२५ कोटी जण बरे झाले आहे. त्याचवेळी ५.२१ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतातील सक्रिय रुग्णांची संख्या ११ हजाराच्या आसपास आहे.

आठवडाभरात संसर्गाचा असा फैलाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT