Corona Outbreak whos warning amid surging corona cases globally  
ग्लोबल

Corona : भय संपलेले नाही! WHO ने दिला इशारा

सकाळ डिजिटल टीम

देशात कोरोना रुग्णांची सख्या आटोक्यात आलेली असताना, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातील देशांना पुन्हा एकदा सावध केले आहे. कारण पाश्चात्य देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर कोरोनाव्हायरस संसर्गाच्या नवीन रुग्णांची संख्या 7 टक्क्यांनी वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी इशार दिला आहे की जोपर्यंत सर्व देशांमध्ये संपुर्ण लसीकरण होत नाही तोपर्यंत जग वाढत्या कोरोना साथ आणि त्याच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटशी लढत राहील.

"आपल्या सर्वांना साथीच्या आजाराला मागे टाकून पुढे जायचे आहे. परंतु आपली कितीही दूर जावे अशी इच्छा असली तरी, ही महामारी संपलेली नाही. जोपर्यंत आपण सर्व देशांमध्ये मोठ्या स्तरावर लसीकरण कव्हरेज होत नाही तोपर्यंत, आपल्याला संसर्ग वाढण्याचा धोका आणि नवीन व्हेरिएंट्सना तोंड द्यावे लागेल ”, असे डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस म्हणाले.

डब्ल्यूएचओने यापूर्वी सांगितले होते की, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद कमी झाली असतानाही, पाश्चिमात्य देशांमध्ये वाढत्या संसर्गामुळे गेल्या आठवड्यात जागतिक स्तरावर नवीन कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या 7 टक्क्यांनी वाढली आहे.

"कोविड-19 रुग्णांच्या संख्येत जागतिक वाढ सुरूच आहे, आशिया खंडात मोठा प्रादुर्भाव झाल्याने आणि युरोपमधील ताज्या लाटेमुळे अनेक देश आता कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनचा सर्वाधिक मृत्यू दर पाहत आहेत. यावरुन ओमिक्रॉनचा प्रसार किती वेगाने होतो हे दिसून येते आणि ज्यांना लसीकरण केलेले नाही त्यांच्यासाठी मृत्यूचा धोका वाढतो, विशेषत: वृद्ध लोक" असे गेब्रेयसस म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT