Corona Update china sakal
ग्लोबल

Corona Update : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक; रुग्णांच्या संख्येत ९५ टक्क्यांनी वाढ

रुग्णालय, चाचणी केंद्रावर रांगा; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

बीजिंग : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहा:कार माजविला आहे. शांघाय आणि अन्य काही शहरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ८५ ते ९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या असून त्यांच्यावर जमिनीवर उपचार केले जात आहेत. डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या देखील कमी झाली असून औषध आणि ऑक्सिजनचे संकटही निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ धक्कादायक असून येत्या तीन महिन्यांत स्थिती गंभीर राहू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

चीनमध्ये शेकडो नागरिक मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र आहे. रुग्णालयांना मृतदेह ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. खोलीपासून ते रुग्णालयाच्या आवारात मृतदेह ठेवले जात आहेत. स्मशानभूमित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. तज्ज्ञांनी येत्या दोन तीन महिन्यांत चीनमधील सुमारे ८ कोटी नागरिकांना कोरोनाची लागू होऊ शकते, असे भाकीत केले आहे. कोरोना पसरल्यामुळे चीनमधील रस्ते ओस पडले आहेत. धडधाकट नागरिक घराबाहेर पडण्यास बिचकत आहेत. चीनच्या सरकारने अगोदरच लॉकडाउन लागू केले आहे. शांघाय रेल्वे स्थानकावर आणि विमानतळावर नागरिकांची गर्दी उसळली आहे. दुसऱ्या शहरात पलायन होत असून शांघाय येथे कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.

तपासणी केंद्रावर रांगा

कोरोनाच्या तपासणी केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या आहे. नॅशनल ब्युरो ऑफ एशियन रिसर्चने केलेल्या दाव्यानुसार यावर्षी हिवाळ्यात चीनमध्ये आठ कोटींपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच संसर्ग पसरण्याचा वेग आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. रुग्णालयात रुग्णांची वाढती संख्या पाहता खाटा कमी पडत आहेत. औषधांची टंचाई निर्माण होत आहे. चीनमध्ये आता केवळ १ लाख लोकांमागे दहा आयसीयू बेडची व्यवस्था आहे. संसर्ग वाढत असताना आणि खाटा कमी पडत असताना रुग्णांना जमिनीवरच झोपावे लागत आहे.

मृतदेह ठेवण्यास जागा नाही

कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णालयात मृतदेह ठेवण्यास जागा नसल्याचे दिसून येते. स्मशानभूमित अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागत आहे. चीनकडून आकडेवारी लपविली जात असल्याचा आरोप केला जात आहे. नोव्हेंबर मध्यांपर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचवेळी दररोज दहा हजाराहून अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. दुसरीकडे स्मशानभूमी आणि रुग्णालयातील व्हिडिओ मात्र कोरोनाची भयंकर स्थिती दाखवत आहेत. सोशल मीडियावरच्या व्हिडिओनुसार चीनमधील रुग्णालय रुग्णांनी खचाखच भरलेले आहेत. शवागरात जादा आरोग्य कर्मचाऱ्यांना तैनात केले जात आहे.

अनेक ठिकाणांहून हटविले होते निर्बंध

देशात मोठ्या प्रमाणात आंदोलन होऊ लागल्याने सात डिसेंबर रोजी चीनच्या अनेक भागांतून निर्बंध काढण्यात आले. लोकांनी झीरो कोरोना धोरणाला तीव्र विरोध केला. निर्बंध उठविण्यात आले तेव्हा चाचणीचे प्रमाणही घसरले. रविवारी चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या २०९७ राहिली. मात्र तज्ज्ञांनी हा आकडा मान्य केलेला नाही. मात्र लसीकरण वाढविल्यास आकडे कमी होतील, असा दावा आरेाग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चीनच्या ९० टक्के नागरिकांनी संपूर्ण लस घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत निम्म्याच लोकांनी लसीचे तीन डोस घेतले आहेत. त्यातही ८० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांची संख्या अधिक आहे.

कोरोनाची स्थिती

  • शाळांना सुटी. ऑनलाइन शिक्षणावर भर देण्याची सूचना

  • वाढती रुग्णसंख्या पाहून स्टेडियममध्ये तात्पुरते रुग्णालये उभारण्याची तयारी

  • येत्या तीन महिन्यांत चीनमधील ६० टक्के लोकांना कोरोना

  • तज्ज्ञांच्या मते, येत्या तीन महिन्यांत १० लाखाहून अधिक मृत्युमुखी पडण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT