REUTERS sakal media
ग्लोबल

ब्राझीलचे अध्यक्ष गोत्यात; हेतुपुरस्सर गुन्ह्यासह संसद नऊ आरोप ठेवणार

कोरोनाच्या जागतिक साथीच्या कालावधीत असंख्य वेळा केलेले नियमभंग ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांना भोवणार आहेत

सकाळ वृत्तसेवा

साओ पावलो : कोरोनाच्या जागतिक साथीच्या कालावधीत असंख्य वेळा केलेले नियमभंग ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांना भोवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध बाराशे पानी चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून हेतुपुरस्सर गुन्ह्यांसह त्यांच्याविरुद्ध ९ आरोप दाखल केले जाणार आहेत.

मवाळ विचारसरणीचे संसद सदस्य रेनन कॅलैरॉस यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल तयार करण्यात आला. बोल्सोनारो यांनी प्रभावहीन औषधांची शिफारस केल्यामुळे त्याचा अवलंब करण्यात आला. परिणामी अनेक रुग्णांना यातना झाल्या. अनेक मंत्री, अधिकारी, उद्योग क्षेत्रातील अधिकारी, रुग्णालयांचे व्यवस्थापक यांचेही जबाब घेतले.

प्रियजन गमावलेल्यांचे ह्रदयद्रावक अनुभव

कोरोनामुळे प्रियजनांना मुकलेल्या भावविवश साक्षीदारांचे जबाब, त्यांचे थरकाप उडविणारे अनुभव चौकशी समितीसमोर नोंदविण्यात आले. २५ वर्षांचा मुलगा गमावलेला टॅक्सीचालक मार्सियो अँटोनियो सिल्वा याने सांगितले की, देशाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने आमची माफी मागितली पाहिजे. हा काही राजकारणाचा प्रश्न नाही. इथे आपण जीवाबद्दल बोलतो आहोत. रियो दा पाझ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष अँटोनियो कार्लोस कोस्टा यांनी सांगितले की, देशातील जनता शोकसागरात बुडाली असताना बोल्सोनारो यांनी कधीही अश्रू ढाळले नाहीत.

मंत्री, पुत्रांवरही आरोप

अनेक मंत्री तसेच बोल्सोनारो यांच्या तीन मुलांविरुद्धही आरोप दाखल करावेत अशी शिफारस अहवालात केली जाण्याची शक्यता आहे. यात फ्लॅव्हीयो हा बोल्सोनारो यांचा मुलगा एका समितीचा सदस्य आहे. हा अहवाल सरकारी वकील, मुख्य न्यायालयाला पाठविला जाईल. याशिवाय हेगमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयासही तो पाठविला जाऊ शकतो.

संसदीय समितीचा पाठिंबा

सरकारच्या संसदीय समितीचे प्रमुख फर्नांडो बेझेर्रा यांनी मात्र बोल्सोनारो यांना पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, हा अहवाल म्हणजे जणू काही एक वाक्यच आहे. तुम्ही अध्यक्षांच्या दृष्टिकोनावर टीका करू शकता, पण त्यांच्यावर दोषारोप ठेवू शकत नाही.

गटबाजीमुळे गंभीर आरोप मागे

बोल्सोनारो यांच्याविरुद्ध भोंदूगिरी, मानवतेविरुद्ध गुन्हा असे आरोप आहेत. मनुष्यवध आणि नरसंहार अशा आरोपांचा उल्लेख अखेरच्या क्षणी मागे घेण्यात आले. चौकशी आयोगातील गटबाजीच यास कारणीभूत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवण्याच्या हेतूने उतरणार मैदानात

देशात खळबळ! मोठा पक्ष फुटणार? १६ खासदारांचे फोन बंद, २२ खासदार पक्ष फोडण्यास तयार; मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून

India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड

CM Devendra Fadnavis: चार हजार कोटींची गुंतवणूक, रोजगारनिर्मितीला चालना; पुण्यातील प्रकल्पाचाही विस्तार

Latest Marathi News Update: पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत देशाचे नेतृत्व करत राहावे - केशव प्रसाद मौर्य

SCROLL FOR NEXT