covishield 
ग्लोबल

युरोपात कोविशील्डला मंजुरी का नाही? EMA ने सांगितलं कारण

सूरज यादव

युरोपिय मेडिसीन असोसिएशनने कोविशील्डला ग्रीन पास का दिला नाही याचं कारण सांगितलं आहे.

युरोपिय युनियनने कोविशील्ड लसीला मंजुरी दिलेली नाही. यामुळे युरोपात जाणाऱ्या भारतीयांसाठी नवीनच समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी युरोपिय मेडिसीन असोसिएशनने कोविशील्डला ग्रीन पास का दिला नाही याचं कारण सांगितलं आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी ट्विटरवरून यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. त्यात पूनावाला यांनी म्हटलं होतं की, यावर लवकरच मार्ग निघेल अशी आशा आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने कोविशील्ड लसीला मंजुरी का दिली नाही? ग्रीन पास नाकारण्याचे कारण काय याची माहिती दिली आहे.

ग्रीन पाससाठी मंजुरी देण्यात आलेल्या लशींमध्ये कोविशील्ड नसल्याचे कारण सांगताना ईएमएने म्हटलं की, एस्ट्राझेनकाच्या फॉर्म्युल्यानुसार कोविशील्ड लस तयार झाली आहे. मात्र कोविशील्ड लसीला युरोपिय देशांमध्ये परवानगी मिळालेली नाही. लसीचे उत्पादन करण्यात येत असलेली ठिकाणे वेगळी असल्यामुळे त्यात फरक असण्याची शक्यता युरोपियन मेडिसिनच्या ग्रुदनिक यांनी म्हटलं आहे.

काय आहे ग्रीन पास पद्धत

युरोपिनय युनियनने लसीसाठी ग्रीन पास पद्धत सुरू केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने मंजुरी दिलेली लस घेतलेल्यांनाच हा पास दिला जाणार आहे. युरोपात प्रवेश करण्यासाठी ग्रीन पास आवश्यक आहे. या पासच्या आधारावर संबंधित प्रवाशाला युरोपातील 27 देशांमध्ये प्रवेश मिळू शकतो. 1 जुलै पासून ग्रीन पास पद्धत लागू करण्यात येणार आहे. स्पेन, जर्मनी, ग्रीस, पोलंड या देशांमध्ये ग्रीन पास लागू झाला आहे. युरोपातील कायद्यानुसार मंजुरीसाठी लशीचे उत्पादन होत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाते. त्यानंतरच लसीला मंजुरी मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT