Donald Trump sakal
ग्लोबल

Donald Trump : हॅरिस यादेखील अकार्यक्षमच;‘रिपब्लिकन’चे उमेदवार डाेनाल्ड ट्रम्प यांची टीका

डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, बायडेन यांनी पाठबळ दिलेल्या कमला हॅरिस यांच्यावरही टीकेची झोड उठवत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, बायडेन यांनी पाठबळ दिलेल्या कमला हॅरिस यांच्यावरही टीकेची झोड उठवत दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कमला हॅरिस या बायडेन यांच्याइतक्याच अकार्यक्षम असल्याचे ट्रम्प यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. तसेच, बायडेन हे मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम असल्याने ते स्वत:हून शर्यतीतून बाहेर पडणे शक्य नाही, असे म्हणत ट्रम्प यांनी बायडेन यांना बाहेर फेकले गेल्याचेही सूचित केले.

कमला हॅरिस यांच्या निवडीबाबत ट्रम्प यांच्या कार्यालयाने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. ‘‘बायडेन हे जितके अकार्यक्षम होते, तितक्याच कमला हॅरिसही आहेत. देशासाठी तर त्या बायडेन यांच्यापेक्षाही अधिक धोकादायक आहेत. बायडेन यांच्या कारस्थानांना अमलात आणण्याचे काम हॅरिस यांनीच केले आहे. या दोघांमध्येही फारसा फरक नाही.’’ बायडेन यांची प्रकृती चांगली नसल्याचे माहिती असूनही हॅरिस यांनी देशहिताकडे दुर्लक्ष करत बायडेन यांना पाठिंबा का दिला, असा सवालही ट्रम्प यांच्या वतीने विचारण्यात आला आहे.

‘विजय आपलाच’

ट्रम्प यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, बायडेन यांनी आपल्या देशाची मान खाली घातली आहे. त्यांनी आपल्या देशाच्या सीमा खुल्या करत बेकायदा निर्वासितांना प्रवेश दिला. यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. बायडेन यांनी आपली अर्थव्यवस्था रसातळाला नेली. हे सर्व जनतेला समजले असल्याने आता आपला विजय निश्‍चित आहे. येत्या पाच नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत आपणच विजयी होणार आहोत. त्यानंतर आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT