who chief Tedros Adhanom Ghebreyesus Sakal Media
ग्लोबल

...तर डेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरणार; WHO चा इशारा

नामदेव कुंभार

डेल्टा व्हेरियंटबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे. डेल्टा व्हेरियंट जवळपास 132 देशात पसरला असून लसीकरण न झाल्यास तो अधिकच घातक ठरेल. परिस्थिती बिघडण्यापूर्वीच डेल्टाचा प्रसार रोखावा, असा इशारा आरोग्य संघटनेनं दिला आहे. गेल्या आठवड्याच 4 मिलियन म्हणजेच 40 लाख नवे रुग्ण जगभरात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 200 मिलियनच्या पुढे गेली आहे. त्यामुळे भविष्यातही डेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक ठरु शकतो, त्यामुळे वेळीच लसीकरण करणं गरजेचं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. टेड्रॉस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत डेल्टा व्हेरियंटबाबात धोक्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, डेल्टा व्हेरियंटला रोखायचं असेल तर जगभरातील सर्वच देशांनी वेगानं लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. अन्यथा डेल्टा व्हेरियंट अधिक धोकादायक आणि घातक अन् जीवघेणा ठरु शकतो. डेल्टा व्हेरियंटला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील सर्व देशांनी प्रयत्न करायला हवेत, अन्यथा परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.

डॉ. टेड्रॉस म्हणाले की, आतापर्यंत कोरोनाचे चार धोकादायक व्हेरियंट समोर आले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव वेगानं होत असल्यामुळे व्हेरियंटमध्ये वाढ होत आहे. नियमंत्रण न मिळवल्यास यापुढेही व्हेरियंटमध्ये वाढ होतच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT