International Friendship Day 2022 Esakal
ग्लोबल

International Friendship Day 2022 : खरचं पहिल्या महायुद्धानंतर जागतिक मैत्री दिनाची सुरुवात झाली का ?

मैत्रीच्या नात्यांचा सोहळा म्हणजे फ्रेंडशिप डे असतो.

सकाळ डिजिटल टीम

मैत्रीचं नातं हे रक्ताच्या नात्याइतकेच घट्ट असते. पण आपण ठरवलं तर ते रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट बनवू शकतो. त्यामुळे मैत्रीचं नातं हे जगातील सर्व नात्यांच्या पलीकडेचं असतं, असं सांगितलं जातं. एकदा का मैत्रीची रेशीमगाठ बांधली की, मग ते सुटता सुटत नाही. अशाच मैत्रीचा नात्यांचा सोहळा म्हणजे फ्रेंडशिप डे असतो. फ्रेंडशिप डेचा एकंदरीत इतिहास पाहता व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, चॉकलेट डे यांसारख्या दिवसांप्रमाणे फ्रेंडशिप डेचा पायांडा पाश्चिमात्य देशांमध्ये रुजवण्यात आला. ग्रिटिंग कार्ड, सोशल मीडिया आणि एसएमएसच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि आयुष्यभर मैत्री निभवण्याचे वचन घेतले जाते.

आज आतंरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे आहे त्यानिमित्ताने त्यांच्या जन्माच्या प्रचलित वेगवेगळ्या तिन गोष्टी आपण पाहणार आहोत.

चला आता पाहू या पहिली गोष्ट..

फ्रेंडशिप डे ची सुरुवात ही जगातील सर्वांत मोठ्या युद्धात दडली आहे, असे म्हटले जाते. पहिल्या महायुद्धानंतर अनेक देशांमध्ये आपपसात द्वेष, शत्रुत्व आणि असंतोषाची भावना निर्माण झाली. ही भावना संपुष्टात आणण्यासाठी 1935 मध्ये अमेरिकन सरकारने फ्रेंडशिप डेची सुरुवात केली. त्यावेळी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल, असे ठरवण्यात आले. या मागचे प्रमुख कारण म्हणजे रविवारी बहुतांश लोकांना सुट्टी असते. त्यामुळे एकत्रित येऊन हा दिवस साजरा केला जाऊ शकतो. पुढे कालांतराने युनायटेड नेशन्सने 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

दुसरी गोष्ट अशी आहे की, सन 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी अमेरिकन सरकारने एका निर्दोष व्यक्तीला यमसदनी धाडले होते. त्या व्यक्तीला मारल्यानंतर त्याच्या मित्राने त्याच्या आठवणीत आत्महत्या केली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकी लोकांनी हा दिवस आंतरराष्ट्रीय फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकार समोर ठेवला. त्या निर्दोष व्यक्तीचा जीव घेतल्याने जनता संतापली होती. त्यामुळे अमेरिकन सरकारने तब्बल 21 वर्षांनी 1958 मध्ये तो प्रस्ताव मंजूर केला, अशीही एक गोष्ट फ्रेंडशिप डे संदर्भात सांगितली जाते.

तिसरी गोष्ट अशी सांगितली जाते की, सन 1930 मध्ये एका व्यापाऱ्याने फ्रेंडशिप डे साजरा करण्यास सुरुवात केली. जगभरातील सर्व लोकांप्रमाणे मित्रांसाठी एक खास दिवस असावा, या उद्देशाने या व्यापाराने फ्रेंडशिप डेची संकल्पना राबवण्यास सुरुवात केली. त्यानंतर युरोप आणि आशिया खंडातील बहुतांश देशांमध्ये ही परंपरेला पुढे नेऊन फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला. तर, अमेरिकेतील पेराग्वेमधील डॉक्टर रमन आर्टिमियो यांनी 20 जुलै 1958 रोजी एका डिनर पार्टीदरम्यान मित्रांसाठी खास दिवस असावा, अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला, असे सांगितले जाते.

अशा या फ्रेंडशिप डेच्या जन्माच्या तिन वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींनी राबवलं ऑपरेशन डी-टू'', उज्वल निकमांनी घेतलं थेट पाकिस्तानचं नाव

Trip Locations : गुगलवर वर्षभरात सर्च झालीत टॉप 5 ठिकाणे, दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्लॅन करा ट्रीप, खर्चही एकदम कमी

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

ICC Rankings: वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा नंबर १! ऑस्ट्रेलियान खेळाडूला धक्का; पण, स्मृती मानधनाने गमावला ताज

नियती इतकी निर्दयी कशी? अपघात आई-वडिलांचं छत्र हरवलं, निरागस लेकरांनी एकमेकांना सावरलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT