Donald Trump
Donald Trump Sakal
ग्लोबल

Donald Trump : अडचणी संपेनात; पॉर्नस्टारनंतर आता लेखिकेनेही केला बलात्कार, लैंगिक शोषणाचा आरोप

वैष्णवी कारंजकर

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सनंतर आता अमेरिकी स्तंभलेखिका ई. जीन कॅरोल हिनेही ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषण व बलात्काराचा आरोप केला आहे. त्यांच्यावर आणखी एका प्रकरणात कारवाई सुरू असतानाच आता हा नवा आरोप करण्यात येत आहे.

कॅरोल यांनी न्यायालयात बोलताना सांगितलं की ट्रम्प यांनी मॅनहॅटनच्या एका दुकानाच्या चेंजिग रुममध्ये त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. त्यानंतर अपमानजनक विधानं करून चेष्टाही केल्याचं या लेखिकेने म्हटलं आहे.

मंगळवारी न्यायालयात कॅरोल यांनी पहिल्यांना २०१९ मध्ये न्यूयॉर्क पत्रिकाद्वारे प्रकाशित झालेल्या आपल्या पुस्तकातल्या एका भागामध्ये हा आरोप केला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूयॉर्कमध्ये लागू होणाऱ्या एका नव्या कायद्यानुसरा, कॅरोलने नवीन गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषण आणि छेडछाड करण्याचा आरोप केला आहे.

यापूर्वी पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी त्यांनी स्टॉर्मीला पैसे देऊन गप्प राहायला सांगितलं. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांचे संबंध होते. हे प्रकरण २००६ चं आहे. यावेळी आपण तयार नसताना ट्रम्प यांनी आपल्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप स्टॉर्मीने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT