Trump, America, WHO
Trump, America, WHO 
ग्लोबल

ट्रम्प यांची थेट 'WHO'लाच धमकी; या गोष्टीसाठी दिला 30 दिवसांचा अवधी!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) उघड-उघड धमकी दिली आहे. आरोग्य संघटनेने येत्या 30 दिवसांत संस्थेच्या कार्यप्रणालीत प्रमुख  सुधारणा कराव्यात नाही तर अमेरिकेकडून दिला जाणारा निधी पूर्णपणे रोखला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला असून  जागतिक आरोग्य संघटनेनं चीनची बाजू घेऊ नये, असेही ट्रम्प यांनी सुनावले आहे.  जागतिक आरोग्य संघटनेचे महानिर्देशक डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी WHO आणि त्यांच्या प्रमुखांवर टीका केली आहे. कोरोना व्हायरस संबंधात संघटनेने केलेल्या चुकांची शिक्षा संपूर्ण जग भोगत आहे. याची जबाबदारी स्वीकारुन डॉक्टर टेड्रोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली आहे.  

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हे स्पष्ट होतं की, कोरोनाला रोखण्यासाठी आपली संघटना आणि आपण वेळोवेळी चुकीची पालले उचली. जगासाठी ते महागात पडल्याचं दिसत आहे. WHO ने पुढे जाण्यासाठी आपली स्वतंत्रता दाखवणे आवश्यक आहे. या वैश्विक संस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही चर्चा सुरु केली आहे. मात्र, तात्काळ पाउल उचलनं गरजेचं आहे. आपण अधिक वेळ वाया घालवू शकत नाही, असं ट्रम्प यांनी डॉ. टेड्रोस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

चीनमधून येणाऱ्यांवर अमेरिकेने निर्बंध लादले नसते तर देशात आणखी लोक मृत्यूमुखी पडले असते. मात्र, आरोग्य संघटना चीनमधून येणाऱ्या लोकांवर निर्बंध लादण्याच्या विरोधात होती. त्याचे वाईट परिणाम जगभरात आपल्याला पाहायला मिळत आहे. WHO चीन केंद्रीत आहे. तसेच WHO चीनचं बाहुलं बनून काम करते, असा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. आरोग्य संघटनेने अतिशय वाईट कामगिरी केली आहे. अमेरिका संघटनेला वार्षिक 45 कोटी डॉलर देते. तर चीन संघटनेला 3.8 कोटी डॉलर देते. जानेवारी महिन्यात चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादण्यास WHOने नकार दिला. ते माझ्या विरोधात गेले. त्याची वाईट फळं आपण भोगत आहोत. WHOने आपल्या संघटनेत बदल करावेत नाहीतर अमेरिकेकडून त्यांना होणारी मदत पूर्णपणे रोखली जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेवर मोठे संकट कोसळले आहे. अमेरिकेने कोरोना बाधितांच्या बाबतीत 15 लाखांचा आकडा पार केला आहे. सर्वात भयानक म्हणजे अमेरिकेत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 90 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे अमेरिका कोरोनाची सर्वाधिक झळ पोहोचलेला देश ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT