ग्लोबल

अफगाणिस्तान हादरले; भूकंपात २६ जणांचा बळी

सकाळ डिजिटल टीम

अफगाणिस्तानला भूकंपाचे दोन मोठे धक्के बसले असून यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

काबुल - अफगाणिस्तान (Afghanistan) सोमवारी झालेल्या भूकंपाने (Earthquake) हादरले आहे. पश्चिमेकडे असलेल्या बगदीस प्रांतात सोमवारी दुपारी दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले. यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कमेनिस्तानला लागून असलेल्या सीमेजवळील परिसराला या भूकंपाचा धक्का बसला. एका स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २६ जणांचा मृत्यू झाला असून आकडा वाढण्याची शक्यता आहे.

भूकंपात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सध्या बचावकार्य सुरु असून भूकंपामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहे. पहिला भूकंप ५.३ रिश्टर स्केलचा आणि दुसरा ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडे असणाऱ्या कदिस जिल्ह्यामध्ये भूकंपामुळे मोठं नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्रीसुद्धा पाकिस्तानच्या उत्तरेकडील भागात ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT