ग्लोबल

India Vs China: भारतीयांनी 'या' बाबतीत टाकले चीनला मागे; वाचा काय म्हणाला एलॉन मस्क

Elon Musk: जात आणि लिंगनिहाय उत्पन्न असामनतेवर होणाऱ्या वादाचे त्यांनी खंडन केले आहे.

सकाळ वृ्त्तसेवा

Indians In America: अमेरिकेत स्थलांतरित झालेले भारतीय यशस्वी ठरत असून भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक कमाईत अव्वल आहेत. चीन, तैवान आणि जपानी वंशाच्या आणि श्‍वेतवर्णीय अमेरिकी नागरिकांना भारतीयांनी कमाईत मागे टाकले आहे,’ असे निरीक्षण टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी नोंदविले आहे.

मस्क यांनी त्यांच्या मालकीच्या ‘एक्स’ या सोशल मीडियावर मस्क यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. अमेरिका ही संधीची खाण आहे, अशी स्तुती त्यांनी केली आहे.

अमेरिकेच्या जनगणना विभागाच्या २०१८ मधील माहितीचा आधार घेत त्यांनी विविध देशांतून अमेरिकेत स्थलांतर झालेल्या नागरिकांच्या सरासरी कौटुंबिक उत्पन्नाची आकडेवारी दिली आहे. मस्क हे स्वतः दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत स्थलांतरित झालेले आहेत. जात आणि लिंगनिहाय उत्पन्न असामनतेवर होणाऱ्या वादाचे त्यांनी खंडन केले आहे.

‘द रॅबिट होल’ या नावाच्या ‘एक्स’च्या वापरकर्त्याच्या मूळ पोस्टमध्ये ‘मेडियन यूएस हाउसहोल्ड इन्कम बाय सिलेक्टेड एथनिक ग्रुप्स २०१८’ या शीर्षकाने जनगणना अहवालातील माहितीचा उल्लेख मस्क यांनी केला आहे. आशियाई महिला अमेरिकेतील गोऱ्या पुरुषांपेक्षा जास्त कमावतात, हे दाखविणारी आकडेवारी मस्क यांनी त्यांच्या हँडलवरून पुन्हा शेअर केली होती. याची मूळ पोस्ट आता ‘एक्स’वरून गायब झाली आहे. २०२२ मध्ये अमेरिकेतील आशियाई कुटुंबाचे एकूण सरासरी उत्पन्न एक लाख आठ हजार ७०० डॉलर एवढे होते.

काही निवडक देशांमधून अमेरिकेत स्थलांतर झालेल्यांचे सरासरी कौटुंबिक उत्पन्न (२०१८) (डॉलरमध्ये)

१,१९,८५८

भारतीय अमेरिकी

९५,७३६

तैवान

८१,४८७

चीन

८०,०३६

जपान

७७,३१५

पाकिस्तान

७५,२७९

फिलिपिनो

७४,४९७

इंडोनेशिया

७२,०७४

कोरिया

६७,५३८

कंबोडिया

६७,३७२

हमाँग

६७,३३१

व्हिएतनाम

६५,९०२

श्‍वेतवर्णीय अमेरिकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT