Russian spy Aliia Roza esakal
ग्लोबल

'किशोरवयात घुसखोरीसाठी सेक्स आणि मोहात पाडण्यास शिकवलं'

सकाळ डिजिटल टीम

हेरगिरीच्या दुनियेची शोकांतिका सांगणारी ही महिला आता 37 वर्षांची आहे.

एका 37 वर्षीय महिला गुप्तहेराच्या खुलाशानं जग ढवळून निघालंय. जगातील महासत्ता असलेल्या देशाची हेरगिरी केल्याचा खुलासा या महिलेनं केलाय. यासाठी तिनं लष्करी प्रशिक्षण (Spy Training) घेतलं होतं. मिलिटरी ट्रेनिंगमध्येच (Military Academy) तिला फिजिकल रिलेशन (Physical Relation) ठेवून माहिती कशी मिळवायची हे शिकवलं गेलं. एकदा हेरगिरीच्या या धोकादायक खेळात पकडल्यानंतर तिला मारण्यासाठी जंगलात नेलं होतं. हेरगिरी करताना ज्या ड्रग्ज माफियाला रंगेहात पकडलं गेलं, त्याच व्यक्तीनं या महिला गुप्तहेरला गोळ्या घालून ठार होण्यापासून वाचवलं होतं.

हेरगिरीच्या दुनियेची शोकांतिका सांगणारी ही महिला आता 37 वर्षांची आहे. ही महिला वयाच्या 18 ते 20 व्या वर्षी एक कुशल गुप्तहेर बनली होती. आलिया रोजा (Aliia Roza) असं या मुलीचं नाव आहे. मूळची रशियाची असलेली ही गुप्तहेर सध्या अमेरिकेतील बेव्हरली हिल्समध्ये स्थायिक झालीय. बेव्हरली हिल्सच्या आधी तुर्कस्तानमध्ये स्थायिक होण्याचा तिचा मानस होता. त्यासाठी ती तिथंही पोहोचली होती, पण काही कारणांमुळं ती तिथं जास्त दिवस राहू शकली नाही. आलिया रोजाच्या दाव्यानुसार, तिनं रशियाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आणि व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या सत्तेतही रशियासाठी अनेक हेरगिरी कारवाया केल्या आहेत, असं तिचं म्हणणं आहे.

'द सन'सोबतच्या संवादात आलिया रोजानं (Russian spy Aliia Roza) आणखी अनेक खळबळजनक खुलाशावर पडदा टाकलाय. आलियाच्या म्हणण्यानुसार, हेरगिरी प्रशिक्षणादरम्यान मला लष्करी प्रशिक्षणासाठी मिलिटरी अकादमीमध्ये पाठवण्यात आलं होतं. तिथं मी अनेक खास तंत्रं/ बारकावे शिकले. ज्याचा नंतर मला हेरगिरी मोहिमांमध्ये खूप उपयोग झाला. त्या प्रशिक्षणात पीडितेला माझं काम करण्यासाठी फूस लावणं, फेरफार करणं आणि मन वळवण्याचं कौशल्य मला शिकवलं गेलं. कोणत्याही हेरगिरीच्या ऑपरेशन दरम्यान मला विविध प्रकारची शस्त्रं ठेवण्यास आणि चालवण्यास शिकवलं, जेणेकरुन मी कोणत्याही ऑपरेशनमध्ये पराभूत होणार नाही किंवा पकडली जाणार नाही. मार्शल आर्टचे प्रशिक्षणही देण्यात आलं, असं तिनं सांगितलंय.

रिपोर्ट्सनुसार, आलिया रोजाचे आजोबा दुसऱ्या महायुद्धातील 'नॅशनल हिरो' होते. त्यांच्या नावानं स्मारकही बांधण्यात आलंय. अफगाणिस्तानातून रशियात येणाऱ्या ड्रग्जच्या खेपांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही आलिया रोजा यांच्यावर सोपवण्यात आली होती. यासोबतच रशियातील मानवी तस्करीचं जाळं फोडण्याचं कामही रोजा यांच्याकडं सोपवण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Success Story: मित्रांची साथ ठरली निर्णायक… सर्व रूममेट बनले अधिकारी… सुरज पडवळ यांची राज्य सेवेत क्लास-वन पदावर निवड

Latest Marathi News Live Update : मुंबईतील सत्याच्या मोर्चाच्या ठिकाणी महाआघाडीतील नेते उपस्थित

Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेत नकारात्मक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी घेतलं चांगलचं फैलावर, आयुक्तांनाही सुनावत आबिटकर म्हणाले...

'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती केली कमाई? तब्बल इतक्या कोटींचं आहे बजेट

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

SCROLL FOR NEXT