greta rihaana 
ग्लोबल

World Over Farmers Protest : ग्रेटा थनबर्ग-रिहानाचं समर्थन; तर कंगनाचा थयथयाट

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर गेल्या 69 दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. ऐन कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचा निर्धार ढळला नाहीये. हे आंदोलन कसेही करुन गुंडाळलं जावं, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील राहिलेले आहे. काल सरकारकडून आंदोलनस्थळी मोठमोठे बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावर अर्ध्या फूटाचे खिळे ठोकून रस्ते बंद करण्यात आले आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने जागतिक स्तरावरुन चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच मोदी सरकारवर निशाणा साधण्यात येत आहे. भारतातील कलाकार-खेळाडू आणि तत्सम सेलिब्रिटी याबाबत चिडीचूप आहेत. काहीतरी ठोस भुमिका घेताना दिसत नसताना जागतिक पातळीवरुन आंदोलनाबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. 

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तिने म्हटलंय की, भारतात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. काल मंगळवारी रात्री उशीरा तिने हे ट्विट केलं आहे. 

याआधी सुप्रसिद्ध जागतिक पॉप आयकॉन सुपरस्टार रिहाना हिने देखील शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये सीएनएन या वृत्तसंस्थेची बातमी टाकली आहे. भारतात सुरु असणाऱ्या  शेतकरी आंदोलनाला दडपण्यासाठी इंटरनेट सुविधा बंद केली असल्याचे सांगणारी तसेच एकूण शेतकरी आंदोलनाबाबत माहिती देणारी ही बातमी होती. या बातमीला शेअर करत तिने म्हटलंय की, आपण या शेतकरी आंदोलनाबाबत का बोलत नाहीयोत? तिच्या या ट्विटनंतर तासाभरातच एक लाखाहून अधिक फॉलोवर्स वाढले.

तिचे हे ट्विट अगदी कमी वेळातच व्हायरल झाले आणि त्यावर चर्चा सुरु झाली. काल रात्री तिचे हे ट्विट ट्रेंडमध्ये आले. तिच्या या ट्विटवर जगभरातून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाची कट्टर समर्थक असलेल्या कंगना रणौत हिने आधीच शेतकरी आंदोलनावरुन नाक मुरडले आहे. तिने देखील या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. 

तिने म्हटलंय की, या आंदोलनाबाबत कुणी बोलत नाहीये कारण ते शेतकरी नाहीयेत तर ते दहशतवादी आहेत जे भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन चीन मोडकळलेल्या भारताचा ताबा घेऊ शकेल आणि अमेरिकेप्रमाणे भारतात चीनी वसाहत स्थापन करु शकेल. गप्प बस मुर्ख मुली, तुमच्या सारख्या बनावट लोकांसारखे आम्ही आमचा देश विकायला काढला नाहीये. दिल्लीच्या सीमेवरील सिंघू, गाझीपूर आणि टिकरी बॉर्डर हे आंदोलनाची महत्त्वाची केंद्र बनली आहेत. सरकारने गेल्या शनिवारी याठिकाणचे इंटरनेट बंद केलं होतं. ते आज बुधवारी पाचपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT