Gas supply Poland Bulgaria cut Russia new war front Natural gas prices skyrocket Europe sakal
ग्लोबल

पोलंड, बल्गेरियाचा गॅसपुरवठा बंद

रशियाची नवी युद्धआघाडी; युरोपमध्ये नैसर्गिक वायूचे दर भडकले

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : रशियाचे चलन असलेल्या रुबलमध्येच मूल्य चुकविण्यास नकार दिल्याबद्दल नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या ‘गॅझप्रोम’ या रशियाच्या सरकारी कंपनीने पोलंड आणि बल्गेरिया या दोन देशांचा नैसर्गिक वायूचा पुरवठा खंडित केला आहे. रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनला सक्रीय पाठिंबा दिल्याबद्दल रशियाने त्यांच्याविरोधात उघडलेली ही युद्धआघाडीच आहे, असे मानले जात आहे.

युरोपमध्ये नैसर्गिक वायूचा पुरवठा केल्याचा परतावा डॉलर अथवा युरोमध्ये न स्वीकारता रुबल या रशियाच्या चलनामध्येच स्वीकारण्याचे आदेश रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी कंपन्यांना दिले आहेत. युरोपमधील अनेक देशांनी याला विरोध केला आहे. त्यामुळे रशियाने आज पोलंड आणि बल्गेरिया या दोन देशांचा वायू पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही देशांनी एक एप्रिलनंतर खरेदी केलेल्या नैसर्गिक वायूबद्दल रशियाला पैसे दिलेले नाहीत. इतर युरोपीय देशांचाही वायू पुरवठा बंद करण्याचा इशाराही ‘गॅझप्रोम’ने दिला आहे.

‘गॅझप्रोम’च्या या निर्णयानंतर युरोपमधील नैसर्गिक वायूच्या दरांत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पोलंडने युक्रेनमधील अनेक नागरिकांना आश्रय दिला असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्धसाहित्यही पुरविले आहे. बल्गेरियाला ९० टक्के वायू पुरवठा रशियाकडूनच होतो.

युरोपमधील विविध देशांच्या ऊर्जा संस्थांनी रशियाच्या या निर्णयावर टीका केली आहे. दोन देशांमध्ये झालेल्या कराराशी राजकारणाचा संबंध जोडला जात असून यामुळे ऊर्जेसाठी रशियावर कमीत कमी अवलंबून राहण्याच्या आमच्या प्रयत्नांना बळच मिळत आहे, असे पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने म्हटले आहे.

युद्धाच्या आघाडीवर

  • युद्धात वापर होऊ नये म्हणून चीनमधील डीजेआय टेक्नॉलॉजी ड्रोन विक्रेत्या कंपनीकडून रशिया आणि युक्रेनमधील व्यवहार स्थगित.

  • युक्रेनच्या पूर्व भागातून बाहेर जाण्यासाठी रेल्वेस्थानकांवर नागरिकांची गर्दी

  • मोल्दोवा येथे बाँबस्फोटांत दोन रेडिओ टॉवर उद्ध्वस्त

  • रोमानिया-युक्रेन यांना जोडणारा रेल्वेपूल क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्ध्वस्त

  • युद्धाचा वेग गाठत मदत करा

वॉशिंग्टन : युक्रेनमधील युद्ध ज्या वेगाने पसरत आहे, तो वेग गाठत युक्रेनला शस्त्रांची आणि इतर साहित्याची मदत करावी. युक्रेनच्या पूर्व भागात रशिया अविरत बाँबवर्षाव करत असून हे युद्ध युक्रेनच्या सीमा ओलांडून इतर देशांमध्येही विस्तारू शकते, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी मित्र देशांना उद्देशून सांगितेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

Amol Khatal Attack : शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला; संगमनेरमध्ये तणाव!

SCROLL FOR NEXT