ग्लोबल

जर्मनीत अँजेला मर्केल यांच्या पक्षाला धक्का; सोशल डेमोक्रेटस आघाडीवर

सकाळ डिजिटल टीम

आतापर्यंत सोशल डेमोक्रेट्सला २६ टक्के मिळाली आहेत. तर कन्झर्वेटिव पक्षाला २४.५ टक्के मते मिळाली आहेत.

जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत अँजेला मर्केल यांच्या कन्झर्वेटीव्ह पक्षाला पराभवाचा धक्का बसत आहे. अँजेला मर्केल यांनी याआधीच घोषणा केली होती की, यावेळी त्या चान्सलर पदासाठी निवडणूक लढणार नाहीत. त्यामुळेच पक्षाला याचा फटका बसल्याचं म्हटलं जात आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानुसार जर्मनीत सोशल डेमोक्रेट्सने बहुमताचा दावा केला आहे. अद्याप अंतिम निकाल हाती आलेले नसले तरी डेमोक्रेट्सने आघाडी मिळवली असून मर्केल यांचा कन्झर्वेटिव पक्ष पिछाडीवर आहे. याआधी १६ वर्षांपासून जर्मनीत कन्झर्वेटिव पक्षाची सत्ता आहे. मर्केल यांच्या कार्यकाळात जर्मनी युरोपात सर्वाधिक वेगाने आर्थिक प्रगती करणारा देश बनला आहे. जर्मनीला यामुळेच युरोपचं ग्रोथ इंजिन असंही म्हटलं जातं.

सोशल डेमोक्रेट्स २००५ नंतर पहिल्यांदा सत्ता मिळवण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सोशल डेमोक्रेट्सला २६ टक्के मिळाली आहेत. तर कन्झर्वेटिव पक्षाला २४.५ टक्के मते मिळाली आहेत. विरोधी पक्षात असलेल्या सोशल डेमोक्रेट्सने बहुमत मिळाल्याचा दावा केला असला तरी त्यांनी सत्ता स्थापनेसाठी मात्र कोणताही दावा केलेला नाही.

जर्मनीमध्ये पुन्हा एकदा आघाडी सरकार बघायला मिळू शकते. सोशल डेमोक्रेट्स आणि कन्झर्वेटिव्ह पक्षाकडून यासाठी हालचाली सुरु आहेत. नव्या सरकार स्थापनेसाठी आणखी काही काळ जाण्याची शक्यता आहे. सोशल डेमोक्रेट्स पक्षाच्या चान्सलर पदासाठी उमेदवार असलेल्या ओलाफ शोल्ज यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पक्षाने प्रत्येक ठिकाणी आघाडी मिळवली आहे.

अँजेला मर्केल यांनी चान्सलर म्हणून युरोपिय संघ एकजूट ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला आहे. २००८ ची आर्थिक मंदी, ब्रेक्झिट, ग्रीकवरील आर्थिक संकट आणि गेल्या दीड वर्षापासूनचे कोरोनाचे संकट या काळात मर्केल यांनी स्वत: पुढाकार घेत युरोपचं नेतृत्व केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT