germeny again lockdown 
ग्लोबल

Corona च्या दुसऱ्या लाटेचा दणका; जर्मनीत पुन्हा लॉकडाऊन

सकाळ डिजिटल टीम

बर्लिन - जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. युरोपातील काही देशांनी यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन केलं आहे. यातच आता जर्मनीने सेमी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जर्मनीला तडाखा बसत असून त्या पार्श्वभूमीवर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी बुधवारपासून देशात लॉकडाऊन लागू करण्यात य़ेणार असल्याची घोषणा केली. 

जर्मनीतील अनेक शहरांमध्ये लोकांना बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. देशातील 16 राज्यांमध्ये 29 हजार 875 नवीन रुग्ण आढळल्यानंतर लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी याबाबतची घोषणा अँजेला मर्केल यांनी केली. बुधवारपासून देशातील दुकाने बंद राहणार असून शाळा आणि डे केअर सेंटरही बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार 10 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. जर्मनीतील 16 राज्यांनी हा लॉकडाऊन लागू करण्यास सहमती दर्शवली आहे. ख्रिसमसच्या आधी झालेल्या या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना याचा झटका बसू शकतो. 

जर्मनीत आतापर्यंत कोरोनामुळे 20 हजार 970 लोकांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीतील मंत्री होर्स्ट सीहोफर यांनी सांगितलं की, सध्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा एकमेव उपाय लॉकडाऊन हा आहे. ख्रिसमस होईपर्यंत वाट बघाली वागेल. मात्र या संकटाशी काही महिने लढावं लागेल. जर्मनीत याआधी नोव्हेंबरमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावनंतर काही निर्बंध घालण्यात आले होते. त्यावेळी रेस्टॉरंट, खेळ इत्यादी बंद करण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT