Germany US block China’s anti-India move at UNSC
Germany US block China’s anti-India move at UNSC 
ग्लोबल

चीनला मोठा झटका; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 'या' दोन देशांनी घेतली भारताची बाजू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बुधवारी चीनला मोठा झटका लागला आहे. अमेरिका आणि जर्मनी या दोन देशांनी भारताची बाजू घेतली आहे. चीनच्या एका प्रस्तावावर आक्षेप घेत अमेरिकेनं अखेरच्या क्षणी ते थांबवलं. चीनच्या प्रस्तावावर अमेरिका आणि जर्मनीनं आक्षेप घेतल्यानं चीनला मोठा झटका लागला आहे. चीनने सोमवारी कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारताविरूद्ध खेळी खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा हा डाव फसला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

चीनच्या या प्रस्तावावर आक्षेप घेणारा अमेरिका हा दुसरा देश होता. यापूर्वी मंगळवारी जर्मनीने हा प्रस्ताव प्रसिद्ध होण्याच्या काही मिनिटांपूर्वी यावर आक्षेप घेत ते थांबवले होते. दोन्ही देशांनी उचललेलं हे पाऊल भारतासोबत संबंध अधिक दृढ असल्याचं प्रतीक असल्याचं मानलं जात आहे. कराची हल्ल्यात ठार झालेल्यांसाठी शोक व्यक्त करतांना चीनने पाकिस्तानशी असलेले दृढ संबंध व्यक्त करण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. चीनने मंगळवारी हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सादर केला. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार यावर न्यूयॉर्कच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजेपर्यंत कोणत्याही सदस्यानं यावर आक्षेप घेतला नसता तर ते संमत झाल्याचं समजलं जातं. यासाठी सायलेंस प्रोसिजरच्या रूपात हा प्रस्ताव सादर करण्यात आलं.
------------------
'या' सरकारने लावले १ लाख ४० हजार चिनी सीसीटीव्ही कॅमेरे; समोर आला नवा वाद
-------------------
चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्या वर
-------------------
यापूर्वी सोमवारी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्लाचा जबाबदार भारत असल्याचा आरोप केला होता. परंतु, जर्मनीनं मंगळावारी संध्याकाळी ४च्या सुमारासच यावर आक्षेप घेतला. पाकिस्तानातील हल्ल्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला जबाबदार धरलं आहे. परंतु ते स्वीकारता येणार नाही, असं मत यूएनमधील जर्मनीच्या राजदूतांनी व्यक्त केलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT