Giorgia Meloni named man of the year by daily women rights activists denounce 
ग्लोबल

जॉर्जिया मेलोनी 2023 च्या 'मॅन ऑफ द इयर'; नव्या वादाला फुटले तोंड!

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना इटलीच्या Libero Quotidiano वृत्तपत्राने मॅन ऑफ द इयर घोषित केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना इटलीच्या Libero Quotidiano वृत्तपत्राने मॅन ऑफ द इयर घोषित केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. महिलांच्या अधिकारांसाठी लढणारे कार्यकर्ते आणि अनेक महिला राजकीय नेत्यांनी हा पुरस्कार लिंगभेद करणारा आणि पुरुषसत्ताक मानसिकता दाखवणारा असल्याचं म्हटलं आहे.

महिला खासदार अलेन्झा वर्दी ई सिनिस्ट्रा यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटलंय की, मेलोनी यांनी ही पदवी नाकारायला हवी. मेलोनी यांना दिलेला पुरस्कार हा पुरुष श्रेष्ठत्व दाखवणारा आहे. पंतप्रधान मेलोनी यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. तुम्ही महिला आहात, पुरुष आहात की इतर गटातील आहात. (Giorgia Meloni named man of the year by daily women rights activists denounce)

मेलोनी यांना 'मॅन ऑफ द इअर' का ठरवण्यात आलंय?

पत्रकार मारिओ सेची यांनी वृत्तपत्रात लिहिलंय की, जगभरातील युद्धामध्ये मेलोनी यांनी लिंग भेदाची लढाई जिंकली आहे. त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या आहेत. त्या दोन्ही युद्धांना सामोऱ्या गेल्या आहेत. राजकीय धक्के सहन केले आहेत. तसेच यूरोप आणि जगाच्या दृष्टीकोनात त्यांनी बदल घडवला आहे.

मारिओ सेची हे Libero Quotidiano वृत्तपत्रामध्ये रुजु होण्याआधी मेलोनी यांच्या पब्लिक रिलेशन टीममध्ये काम करत होते. सेची पुढे म्हणाले की, मलोनी यांनी निवडणूक जिंकून पुरुषांच्या मक्तेदारीला मोडीत काढलं आहे. महिलांना नवा आशावाद दिला आहे. त्यांची वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत त्यांना जिंकण्यासाठी कामाला आली आहे.

दरम्यान, जॉर्जिय मेलोनी या २०२२ मध्ये इटलीत मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत पंतप्रधान झाल्या. त्या मुसोलिनी यांच्या समर्थक मानल्या जातात. काही महिन्यांपूर्वी त्या चर्चेत आल्या जेव्हा त्यांनी आपल्या पतीसोबत घटस्फोट घेतला. त्यांच्या पतीने एका कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या पतीसोबत १० वर्षांचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला होता. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT