putin biden Sakal
ग्लोबल

बायडेन-पुतीन यांच्यात उद्या ‘व्हिडिओ कॉल’

सीमेवरील सैन्याच्या हालचालींमुळे युक्रेनवर आक्रमण करण्याचा रशियाचा इरादा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मॉस्को : युक्रेनच्या सीमेवर असलेल्या रशियाच्या सैन्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे मंगळवारी (ता. ७) व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून चर्चा करणार असल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेवरील सैन्याच्या हालचालींमुळे युक्रेनवर आक्रमण करण्याचा रशियाचा इरादा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सीमेवरील सैन्याच्या हालचाली कमी करण्याबाबत किंवा कोणतीही लष्करी कारवाई न करण्याबाबत पुतीन यांच्याकडून आश्‍वासन घेण्याचा प्रयत्न बायडेन करतील, असे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जेन साकी यांनी सांगितले. युक्रेनच्या सार्वभौमतेला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही यावेळी स्पष्ट केले जाणार असल्याचे साकी यांनी सांगितले. युक्रेनचा समावेश ‘नाटो’ संघटनेत करण्यास रशियाचा विरोध असून आपला उद्देश साध्य करण्यासाठीच ते दबाव निर्माण करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बायडेन यांच्याबरोबरील चर्चेत ते याच मुद्द्यावर भर देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रशियाच्या या भूमिकेला ‘नाटो’चा विरोध आहे. इतर देशांच्या अथवा संघटनेच्या विस्ताराला हरकत घेण्याचा रशियाला कोणताही अधिकार नाही, असे ‘नाटो’ने सुनावले आहे.

निर्बंधांसाठी पर्याय उपलब्ध

अमेरिकेतील संगणक यंत्रणेवर जुलैमध्ये झालेल्या सायबर हल्ल्यावेळी बायडेन आणि पुतीन यांच्यात संवाद झाला होता. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यास त्यांच्यावर निर्बंध घालण्याचे अनेक पर्याय अमेरिकेकडे उपलब्ध असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. रशियाच्या वित्त यंत्रणेत अडथळे आणण्यासाठी रशियाच्या अनेक कंपन्यांवर निर्बंध घालता येऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

Shivprasad Chimpanti : ...अन् त्याच्या जिद्दीसमोर अपंगत्वही हरलं! बोलता-चालताही येईना, गुण मिळवले ६६ टक्के

धक्कादायक! नववीतील विद्यार्थिनीचा शिक्षकाने केला विनयभंग; जामीन मिळाल्यानंतर ‘या’ शाळेने त्याला पुन्हा दिली संधी, अकरावीत शिकणाऱ्या पीडितेला भीती

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीच्या विक्रमी सामन्यात अंगकृश रघुवंशी चमकला... रिंकू सिंगसह गतविजेत्यांसमोर ठेवले तगडे लक्ष्य

Vasai Virar drainage cleanup: वसई-विरारमध्ये ५ जूनपर्यंत २०० हून अधिक नाल्यांची सफाई; फ्लड गेट्स, होल्डिंग पाँड्स अद्याप रखडले

SCROLL FOR NEXT