Hamas frees two Israeli women hostages us advises Israel Hamas War Update  
ग्लोबल

Israeli hostages: इस्राइलच्या डेडलाईननंतर हमासकडून 17 बंधकांची सुटका; 4 विदेशी नागरिकांचा समावेश

इस्राइलकडून शनिवारी बंधकांची सुटका करण्यात आल्यानंतर हमासकडूनही त्यांच्या ताब्यातील बंधकांची सुटका करण्यात आली.

कार्तिक पुजारी

तेल अविव- इस्राइलकडून शनिवारी बंधकांची सुटका करण्यात आल्यानंतर हमासकडूनही त्यांच्या ताब्यातील बंधकांची सुटका करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, १३ इस्राइली नागरिक आणि ४ विदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. हमासकडून सोडण्यात आलेले बंधक इस्राइलमध्ये पोहोचले असल्याची माहिती इस्राइली लष्कराने दिली आहे.

प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर मुक्त नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल. त्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल, असं लष्कराने सांगितलं. इस्राइल सरकारच्या माहितीनुसार, सहा महिला, सात लहान मुलं यांना मुक्त करण्यात आले आहे. मुक्त करण्यात आलेल्या १७ लोकांपैकी ४ थायलंडचे नागरिक असल्याचे समजते.

इस्राईलकडून होणाऱ्या हल्ल्यांना तूर्त विराम लागल्याने गाझामध्ये मदतीचा ओघ सुरू झाला आहे. नागरिकांपर्यंत बचावसाहित्य पोहोचविण्यात हवाई माऱ्यामुळे आतापर्यंत येत असलेली अडचण सध्या दूर झाली असल्याने इजिप्तच्या सीमेवरुन अनेक ट्रकद्वारे औषधे, अन्नपदार्थ, पाणी आणि इतर वस्तू आणल्या जात आहेत. शनिवारी १३ ते १४ अपह्रतांची सुटका होण्याची घोषणा करण्यात आली होती. रात्री उशिरा त्यांची सुटका करण्यात आली.

अमेरिका आणि कतार यांच्या मध्यस्थीने इस्राईल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनुसार, हमासच्या ताब्यात असलेल्या २४० अपह्रतांपैकी ५० जणांना सोमवारपर्यंत सोडले जाणार आहे. हमासने इस्राईलच्या १३ जणांना मुक्त केले. याशिवाय, थायलंडच्या दहा आणि फिलिपिन्सच्याही एका नागरिकाची हमासने सुटका केली.

याबदल्यात इस्राईलने हवाई हल्ले थांबविण्याबरोबरच त्यांच्या ताब्यात असलेल्या ३९ पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका केली. १५० पॅलेस्टिनींना सोडण्याचे आश्‍वासन इस्राईलने दिले. हमासने सोडलेल्या प्रत्येक इस्रायली नागरिकामागे तीन पॅलेस्टिनींना सोडण्याचे करारात मान्य झाले.

दरम्यान, इस्राईलमधील एका अब्जाधीशाच्या मालकीच्या मालवाहू जहाजावर आज ड्रोन हल्ला झाला. हिंदी महासागरातून जात असताना शाहीन-१३६ या ड्रोनद्वारे हल्ला झाला. जहाजावर आदळून ड्रोनचा स्फोट झाल्याने जहाजाचे काही प्रमाणात नुकसान झाले. इस्राईल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून इस्राईलशी संबंधित जहाजांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6 Live Update: आली रे आली राधा मुंबईकर आली! सबसे पाटील राधा पाटीलची 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात एंट्री

Raj Thackeray: पैसे फेकले की जनता विकत मिळते? ठाकरे बंधूंचा सरकारला थेट सवाल, राज ठाकरे म्हणाले- निवडणूक जिंकण्यासाठी...

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

SCROLL FOR NEXT