Israel-Hamas War Esakal
ग्लोबल

Israel-Hamas War: गाझामध्येही हमासने ओलिसांवर केले बलात्कार अन् हत्या...; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Get the latest developments as the war between Israel and Hamas unfolds.: हमाससंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यादरम्यान गाझामध्येही हमासने ओलिसांवर बलात्कार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Israel-Hamas War: हमाससंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ७ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्यादरम्यान अनेक महिलांवर बलात्कार आणि अत्याचार केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. इतकंच नाही तर गाझामध्ये ओलिस ठेवलेल्यांवरही बलात्कार करण्यात आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी गट हमासच्या सैनिकांनी इस्राइलवर हल्ला केला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरू आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संघर्षातील लैंगिक हिंसाचारावरील संयुक्त राष्ट्राच्या विशेष प्रतिनिधी प्रमिला पॅटन यांनी इस्रायइल आणि वेस्ट बँकला भेट दिली. फेब्रुवारीमध्ये काही दिवस त्यांनी इतर तज्ज्ञांसह या भागात भेट दिली होती. यावेळी काही ओलीसांवर बलात्कार झाल्याचे प्रमिला पॅटन यांना आढळले.

या अहवालात म्हटले आहे की, 'गाझा भागात हमास आणि इतर सशस्त्र दलांनी नागरिक आणि लष्करावर केलेल्या हल्ल्यांच्या संदर्भात, मिशन टीमला असे समजले आहे की, 7 ऑक्टोबर रोजी अनेक ठिकाणी लैंगिक हिंसाचार झाला. अनेक भागात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत.

या घटना तीन ठिकाणी घडल्याचे अहवालात म्हटले आहे. यामध्ये नोव्हा म्युझिक फेस्टिव्हल, रोड 232 आणि किबुट्झ रीम यांचा समावेश आहे. या अहवालात माहिती देण्यात आली आहे, 'यापैकी बहुतांश घटनांमध्ये पीडितेवर आधी बलात्कार आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार झाल्याच्याही दोन घटना आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Couple Case : तरुणाच्या त्रासाला कंटाळून दाम्पत्यानं संपवलं जीवन; 'तो' फोनवरून भेटायला बोलवायचा अन्..., अंथरुणात सापडली मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

Nagpur : सख्ख्या भावाकडून अत्याचार, १३ वर्षीय बहीण २६ आठवड्यांची गर्भवती, हायकोर्टाची गर्भपाताला परवानगी

Latest Marathi News Live Update : कुसळंब गोळीबार प्रकरणी तिघांना अटक, पोलिसांनी पाठलाग करत केले जेरबंद

Ranji Trophy Final: जम्मू-काश्‍मीरच्या अजिंक्यपदाची औपचारिकता; पहिल्यावहिल्या रणजी करंडकाचे जेतेपद निश्‍चित

'अनिल कपूरसारखा नवरा नको!' माधुरी दीक्षितने दिलेलं स्पष्ट उत्तर, म्हणालेली... 'आम्ही फक्त...'

SCROLL FOR NEXT