ग्लोबल

'मॅनमेड' का म्हणायचं? 6 वर्षांच्या टेरेसाचा थक्क करणारा प्रश्न

शरयू काकडे

आपल्याला बऱ्याचदा जाणवत नाही की आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यामुळे लैगिंक समानता( gender equality) आणि लैंगिग भूमिकेला( gender roles) धक्का पोहचवत आहोत. पितृसत्ताक समाजात भाषा ही लिंगभेद निर्माण करण्यामध्ये मोठी भूमिका बजावते हे सांगण्याची गरज नाही. रोजच्या जगण्यातील लिंग भेदावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. ''Why it is named Manmade? Why can't be it People Made?'' असा प्रश्न 6 वर्षीय टेरेसाने तिच्या आईला(सोनिया जॉन) विचारला आहे. या प्रश्नामुळे सर्वांनाच आता विचार करायला भाग पाडले आहे. (How six-year-old Teresa Manimala questions on sexism made her a viral celebrity)

नेहमीप्रमाणे बेडटाईम स्टोरी ऐकताना पुस्तकातील लैगिंक असमानता (gender disparities)दर्शविणाऱ्या भाषेबाबत टेरेसाने रोष व्यक्त करते. टेरेसा तिच्या आई सोनियाला विचारते की, ''पुस्तकांमध्ये सगळीकडे Man made असेच का लिहलेले असते? ते People Made किंवा Human Made असे का नाही लिहले जात? त्यावर तिला उत्तर देताना, ''Man Made म्हणताना त्याच महिलांचा समावेश असतो'' असे सोनिया यांनी टेरेसाला सांगतात. त्यावर टेरेसा ठामपणे तिच्या आईला सांगते, ''महिला काही निर्मिती करु शकत नाही का?'' मग ते Human Made असा उच्चार का नाही करत? हे योग्य नाही ना?'' टेरेसाने विचारलेला साधा प्रश्न व्हिडिओमध्ये कैद झाल्यामुळे तिच्या घरातील आणि कुटुबांतील नव्हे तर जगभर सर्वांनी ऐकला.

अमेरिकेतील ओक्लाहोमा येथील स्टिलवॉटर येथे राहणाऱ्या सोनिया जॉन या डेटा अॅनलिस्ट आहेत. एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना, त्यांनी सांगितले की, ''टेरेसा ही जिज्ञासू वाचक आहे. त्यामुळे तिने हे प्रश्न विचाल्यावर मला आश्चर्य वाटले नाही, उलट तिने असे प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्याचा मला आनंद वाटतो. जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिचीही अशीच मानसिकता असावी अशी मला आशा आहे.'' सोनिया आणि तिचे पती जेम्स मनिमाला दोघेही ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर असून आपल्या एकूलत्या एक मुलीला पुस्तकांचा खजिना दिला आहे आणि तिला झोपतानाही पुस्तक वाचण्याची सवय लावली आहे.

''सुरवातीला मी तिच्यासाठी मी पुस्तक वाचत होते पण गेल्या 2 वर्षांपासून ती स्वत:च खूप सारी पुस्तक वाचत आहे. मी तिच्यासाठी सुधा मुर्ती यांची काही पुस्तक आणली होती जी तिला वाचायला खूप आवडतात. असेही सोनिया यांनी यावेळी बोलताना सांगितले.

एकदा बेड टाईम स्टोरी वाचताना टेरसाने पुस्तकांमधील लैगिंक असमानता दर्शविणारा प्रश्न तिच्या आई सोनिया विचाराला.त्याबाबत बोलताना, त्या म्हणाल्या ''लहान मुलांसाठीची अब्राहम लिंकनची बायग्राफी वाचत असताना तिने मला हा प्रश्न विचारले जे मी रेकॉर्ड केले'' आपल्या मुलीच्या प्रश्नांनी चकित झालेल्या सोनिया यांनी व्हॉट्सअॅप गृप, फेसबूक आणि मुलीसाठी सुरु केलेल्या युट्युब चॅनलवर शेअर केलाकुटुंबाला माहिती होण्यापुर्वीच हा व्हिडिओ कोणीतरी टिव्टरवर शेअर केला. तो व्हिडिओ अनेक सेलिब्रिटीही शेअर केला. व्हिडिओ इतका अनपेक्षित पणे व्हायरल झाला की कुंटुबाने व्हिडिओ काढून टाकल्याचे सोनिया यांनी सांगितले.

दरम्यान, लेखक एलिड बिलीटन लिखित फेमस फाईव्ह चे पहिले पुस्तक वाचण्यास सुरवात केले असे टेरेसाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT