Hungary President Resigns 
ग्लोबल

Hungary President Resigns: हंगेरीच्या अध्यक्षांचा राजीनामा; बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषीला दिली होती माफी

हंगेरी देशामधून मोठी घडामोड समोर आली आहे. हंगेरीच्या अध्यक्षा कॅटालिन नोवाक (Katalin Novak Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

कार्तिक पुजारी

बुडापेस्ट- हंगेरी देशामधून मोठी घडामोड समोर आली आहे. हंगेरीच्या अध्यक्षा कॅटालिन नोवाक (Katalin Novak Resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बाल लैंगिक गुन्ह्यातील एका दोषीच्या माफीला मंजुरी दिल्याप्रकरणात त्यांना हा राजीनामा द्यावा लागला आहे.

अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर माजी न्याय मंत्री जुडीत वर्गा (Judit Varga) यांनी देखील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींच्या निर्णयाच्या पत्रावर स्वाक्षरी केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारात राजीनामा देत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.

दोषीच्या शिक्षेला माफी दिल्यानंतर देशात मोठा तणाव निर्माण झाला होता. विरोधकांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर नोवाक यांनी राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला. त्या आपल्या शेवटच्या भाषणात म्हणाल्या की, मी पदाचा राजीनामा देत आहे. ज्यांना मी दुखावलं आणि ज्या पीडितांच्या सोबत मी उभी राहिले नाही त्यांना मी माफी मागते. मी याआधीही आणि यापुढेही मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असेन. (Hungary President Katalin Novak Resigns Over Pardon To Man Convicted In child Abuse Case )

२०२२ च्या निवडणुकीत पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा मान नोवाक यांना मिळाला होता. पंतप्रधान विक्टर ऑर्बन (Prime Minister Viktor Orban) यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जातात. बालगृहाच्या माजी उप संचालकाला माफी देण्यात आल्यानंतर वादाला सुरुवात झाली होती. या व्यक्तीने त्याच्या मालकाच्या बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याला झाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

इंडिपेडेन्ट न्यूज साईट ४४४ ने मागील आठवड्यात अध्यक्षांचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर विरोधकांनी नोवाक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे देशात राजकीय वातावरण तापले होते. शुक्रवारी आंदोलक अध्यक्षांच्या निवावस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. याप्रकरणात अध्यक्षांच्या तीन सल्लागारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अन्य काही मंत्र्यांनीही राजीनामा दिला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT