Imran Khan Arrested  
ग्लोबल

पाक लष्कराचा आंदोलकांवर गोळीबार! सरकारी रेडिओ स्टेशन पेटवलं, परिस्थिती नियंत्रणाबाहेर...

Sandip Kapde

Imran Khan Arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांचे अनेक समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. इस्लामाबादमध्ये जाळपोळ आणि तोडफोड पाहायला मिळत आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी संपूर्ण पाकिस्तानात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र इम्रान खान समर्थक आक्रमक झाले आहेत.

इम्रान खान समर्थकांनी थेट लष्करी कार्यलयांवर हल्ला केला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ देखील करण्यात येत आहे. बलुचिस्तानमधील क्वेटा येथे पाकिस्तानी लष्कराने निदर्शना दरम्यान आंदोलकांवर गोळीबार केला. गोळ्या लागल्याने अनेक आंदोलक जखमी झाले आहेत तर काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर आली आहे.

लेफ्टनंट जनरल आसिफ गफूर हे बलुचिस्तानमधील कॉर्प्स कमांडर आहेत. त्यांच्या निवास्थानी देखील समर्थक घुसले आहेत. यावेळी समर्थकांनी दगळफेक केली. पाकिस्तानमध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.

पाकिस्तानी लष्कर मुख्यालय समर्थकांनी टार्गेट केले आहे. पाकिस्तान लष्कर विरूद्ध जनता असा सामना पाकिस्तानमध्ये सध्या सुरू आहे. लष्कराविरोधात हिंसक आंदोलनाचे नेतृत्व महिला करत आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसाचारानंतर पाकिस्तानी सैन्यात देखील खळबळ उडाली आहे.

इम्रान खानच्या अटकेनंतर संतप्त झालेल्या हिंसक लोकांच्या जमाव पाकिस्तान गुप्तचर संस्था ISI मुख्यालयाकडे देखील गेला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने जनतेवर गोळीबार केला, अनेक लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. आंदोलकांनी रेडिओ पाकिस्तानच्या इमारतीला देखील मोठी आग लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT