Shahbaz Sharif
Shahbaz Sharif esakal
ग्लोबल

सत्तेत येताच शाहबाजचा शरीफांचा मोठा खुलासा; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahabaj Sharif) यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एवढेच नव्हे तर, इम्रान यांनी सरकारी तिजोरीतून भेटवस्तू दुबईला नेली आणि तेथे ती 14 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना हा खळबळजनक खुलासा केला. या भेटवस्तूंमध्ये हिऱ्यांचे दागिने, बांगड्या, घड्याळे आणि इतर अनेक मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाबाबत इम्रान खानविरोधात चौकशी सुरू झाली आहे. (Pakistan PM Sahabaj Sharif On Imran Khan)

लाहोरच्या ज्वेलर्सला विकला नेकलेस

यापूर्वी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने सरकारी तिजोरीतून कोट्यवधींचा हार विकल्याप्रकरणी इम्रान खानविरुद्ध तपास सुरू केला आहे. इम्रान खान यांनी हा नेकलेस जुल्फी बुखारी यांच्यामार्फत लाहोरच्या एका ज्वेलर्सला 18 कोटी रुपयांना विकल्याचे सांगितले जात असून, या पैशातील काही हिस्साच सरकारी तिजोरीत जमा झालेला आहे.

इम्रान खान पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना एक हार भेट देण्यात आला होता. त्यानंतर तो तोशाखान्यात जमा करायचा होता. पण, इम्रान खान यांनी त्यांचे स्वीय्य सहाय्यक जुल्फिकार बुखारी यांना दिला. त्यांनी तो हार एक ज्वेलर्सला १८० दशलक्ष रुपयांमध्ये विकला होता. इम्रान खान यांनी या हाराच्या मोबदल्यात काही रक्कम जमा केली होती. पण, ही रक्कम पाकिस्तानी कायद्याने ठरवून दिलेल्या किंमतीच्या अर्धी नाही. त्यामुळे आता इम्रान खान अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी कायद्यानुसार, राज्यकर्त्यांना भेट दिलेल्या वस्तू तोशाखान्यात जमा करायच्या असतात. त्यांना भेटवस्तू स्वतःजवळ ठेवायची असेल तर त्याची ठरवून दिलेली अर्धी किंमत जमा करावी लागतेय. भेटवस्तू परत केली नाही किंवा रक्कम भरली नाहीतर ती कृती बेकायदेशीर ठरते. इम्रान खान यांनी हाराची किंमती जमा केली. पण, ती ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा कमी होती. त्यामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत स्थानिक माध्यमांनी वृत्त दिलं आहे.

विधानसभेतील अविश्वास ठरावानंतर इम्रान खान यांची हकालपट्टी झाली. त्यानंतर बुधवारी पेशावरमधील आपल्या पहिल्या जाहीर भाषणात इम्रान खान यांनी न्यायव्यवस्थेला प्रश्न केला की, अविश्वास प्रस्ताव पारीत करण्यासाठी मध्यरात्री आपले दरवाजे का उघडले? हा देश मला ४५ वर्षांपासून ओळखतो. मी कधी कायदा मोडला आहे का? मी क्रिकेट खेळलो तेव्हा माझ्यावर कोणी मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता का? असं इम्रान खान म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT