politics
politicsgoogle

फडणवीसांनी केलेल्या ट्वीटचा मी आनंद घेतो - शरद पवार

'राज्यातील सामाजिक ऐक्य संकटात येत असल्याची मला चिंता'
Published on

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर ट्विटद्वारे टीका केली होती. त्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियाही आल्या. दरम्यान, फडणवीस यांच्या अशा ट्विट्सचा मी आनंद घेत असतो, अशी मिश्कीली शब्दांतील टीका आज पवारांनी केली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी बोलताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजपाकडून गैरवापर सुरु असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, राज्यातील सामाजिक ऐक्य संकटात येत असल्याची मला चिंता आहे. प्रश्न सोडवणे ही आपली परंपरा आहे. महाराष्ट्र एकसंघ ठेवला पाहिजे. मात्र तस चित्र पहायला मिळत नाही. ज्यांचा अपेक्षाभंग झाला ते राज्य ताब्यात कसं घेता येईल यामागे लागले आहेत. त्यामुळेच राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांची छापेमारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात या यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचेही ते म्हणाले आहेत. मला जातीयवादी का म्हटलं जात हे माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

politics
'घरबसल्या ट्विट करत राज्याला उद्देशून भाषण करणं म्हणजे..'

पुढे राज ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मार्गाने जात असताना दिसत आहेत. भाजपचा राज्यात अपेक्षाभंग झाला आहे, म्हणून ते महाविकास आघाडीवर तिथे दबाव आणत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आमची नीती आहे. सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये म्हणून सर्वांनी त्यावर काम केले पाहिजे.

मनसेने सादर केलेल्या पुरंदर यांच्या पत्राला शरद पवार यांनी उत्तर दिले, पवार म्हणाले, जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण आहे. मात्र यात पुरंदरे यांनी जेम्स लेनचं कौतुक केलं होतं. जेम्स लेन हे चांगले शिव अभ्यासक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं, असंही ते त्यांनी सांगितलं.

politics
सदावर्तेंना न्यायालयाचा दणका, चार दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com