(फोटो: गेटी/कॅचरमन)
(फोटो: गेटी/कॅचरमन)
ग्लोबल

चक्क ५५५ दातांचा मासा; रोज तुटतात एवढे दात...

सकाळ डिजिटल टीम

हा आहे जगातील सर्वात जास्त दात असलेला प्राणी. या माशाच्या तोंडात चक्क ५५५ दात आहेत. आश्चर्य म्हणजे त्याचे २० दात दररोज तुटतात आणि तेवढेच नव्याने येतात. या ५५५ दातांची तोंडाच्या आत दोन जबड्यात अशा प्रकारे रचना आहे की, त्यात अडकलेला प्राणी चहूबाजूंनी अडकतो. एका झटक्यात हा मासा आपल्या शिकारीचे तुकडे करतो. चला जाणून घेऊया या माशाला इतके दात कसे आले? हा मासा कुठे सापडतो? तो काय खातो? आणि तो मानवासाठी धोकादायक आहे का?

सर्वात जास्त दात असलेल्या या माशाला पॅसिफिक लिंगकॉड म्हणतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, दररोज त्याचे २० दात तुटतात आणि तेवढेच नव्याने येतात. माणसाला नवीन दात यायला खूप वेळ जातो. तेही फक्त आयुष्यात दोनवेळाच येतात. पण इथे त्याच्या शरीरात दात येण्याची आणि तुटण्याची प्रक्रिया खूप वेगाने होते.
वॉशिंग्टन विद्यापीठातील जीवशास्त्राच्या डॉक्टरेट उमेदवार कार्ली कोहेन यांनी सांगितले की, पॅसिफिक लिंगकॉडच्या तोंडाची हाडे आतून पूर्णपणे दातांनी भरलेली असतात. विज्ञानाच्या भाषेत त्याला ओफिओडॉन एलोंगॅटस म्हणतात. उत्तर पॅसिफिक महासागरात आढळणारा हा शिकारी मासा आहे.
पॅसिफिक लिंगकॉडची लांबी सरासरी २० इंच असते, परंतु काही मासे पाच फुटांपर्यंत वाढू शकतात. या माशाचे तोंड कसे काम करते, इतके दात का असतात, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक मासा पकडून त्याची तपासणी केली. या माशाच्या तोंडात इन्सिझर, मोलर्स आणि कॅनाइन्स नसतात. फक्त तीक्ष्ण टोकदार सूक्ष्म दात असतात.
त्याच्या दोन जोड्यांच्या जबड्यांचा आतील थर कठीण असतो, त्यातही खूप बारीक दात बाहेर येतात. प्रत्येक जबड्याच्या मागे एक आधार देणारा जबडा असतो ज्याला फॅरेंजियल जबडा म्हणतात. हा मासा जबड्याच्या साहाय्याने आपल्या भक्ष्याला तोडतो, ज्याप्रमाणे मानव दाढेच्या साहाय्याने काहीही चावतो.
कार्ली कोहेन म्हणतात की, जेव्हा आपण या माशाच्या दातांची तुलना कोणत्याही सस्तन प्राण्याशी करतो, तेव्हा आपल्याला कळते ते किती वेगळे आहेत. त्याची विविधता त्याला मनोरंजक बनवते. त्यामुळे आम्ही त्याचा अभ्यास करण्याचे नियोजन केले. कोणत्याही जीवाच्या दातांचा अभ्यास करून ते कोणत्या प्रकारचे अन्न खातात हे कळू शकते. कारण दात लवकर संपत नाहीत. त्यांचे जीवाश्मही दीर्घकाळ टिकतात.
पॅसिफिक लिंगकॉड हा एकमेव जिवंत मासा आहे, ज्याचे दात मृत माशांच्या जीवाश्मांसोबत ठेवण्यात आले आहेत. हा मासा आपल्या तोंडातून बरेच दात काढतो कारण त्याला सतत नवीन दात परत येत असतात. कार्ले म्हणाले की, हे दात कसे येतात आणि कसे तुटतात याची आपल्याला कल्पना नाही.
कार्लीसोबत, युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडाची अंडरग्रेजुएट बायोलॉजी विद्यार्थिनी एमिली कारने २० पॅसिफिक लिंगकॉडचा अभ्यास केला. या माशाचे दात इतके लहान आहेत की त्यांची तुटण्याची प्रक्रिया पाहणे फार कठीण आहे. कारण तो पाण्यात तळाशी असतो. तो वर फारच कमी वेळा येतो. म्हणूनच त्यांनी या माशाच्या जबड्यात पातळ लाल रंग टाकला.
लाल रंग लावल्याने माशाचा जबडा लाल झाला. त्यानंतर ते एका एक्वैरियममध्ये ठेवण्यात आले, जे फ्लोरोसेंट हिरव्या रंगाने भरलेले होते. त्यामुळे त्याचे दात पुन्हा नवीन रंगात बदलले. यानंतर एमिली कारने हा मासा पाण्यातून बाहेर काढला आणि अंधाऱ्या प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली ठेवलं, जेणेकरून दात मोजता येतील. हे लाल आणि हिरव्या दातांमधील फरक दर्शवते. त्यात २० माशांच्या तोंडातील १० हजारांहून अधिक दात मोजले गेले.
एमिलीने सांगितले की, प्रयोगशाळेत तपासणीदरम्यान तिला कळले की पॅसिफिक लिंगकॉड दररोज तोंडातून २० दात तोडतो. मात्र या माशाच्या तोंडात नवीन दात कसे येतात, याची अजून माहिती मिळाली नाही. हा अभ्यास नुकताच ‘प्रोसिडिंग ऑफ द रॉयल सोसायटी बी’ मध्ये प्रकाशित झाला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT