UNGA 
ग्लोबल

UNGA मध्ये रशियाविरोधात प्रस्ताव मंजूर; भारताची तटस्थ भूमिका

सकाळ डिजिटल टीम

संयुक्त राष्ट्रातील १४१ देशांनी रशियाविरोधातील प्रस्तावाच्या बाजूने मत दिलं तर ५ देशांनी विरोधात भूमिका घेतली.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाने आता युद्धाचं रुप घेतलं आहे. गेल्या सात दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु आहे. रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर हल्ले केले असून ही शहरे बेचिराख झाली आहेत. यामध्ये किव्ह, खारकिव्ह या शहरांचा समावेश आहे. दरम्यान रशियाला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत रशियाविरोधात प्रस्ताव मंजूर कऱण्यात आला आहे. युक्रेनविरोधात युद्ध करण्याच्या उचललेल्या पावलाविरोधात संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं विशेष आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर रशियाविरोधातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

संयुक्त राष्ट्रातील १४१ देशांनी रशियाविरोधातील प्रस्तावाच्या बाजूने मत दिलं तर ५ देशांनी विरोधात मत टाकलं. या मतदानात ३५ देशांनी सहभाग घेतला नाही. भारतानेसुद्धा तटस्थ भूमिका घेतली.

युक्रेनवर रशियाकडून सुरु असलेले हल्ले तात्काळ थांबवले जावेत आणि सर्व रशियन सैन्य मागे घेण्याबाबतच्या प्रस्तावावर १९३ सदस्यांच्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मदतान झालं. युरोपातील अनेक बड्या देशांसह लहान देशांनीसुद्धा रशियाने केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रात रशियाच्या बाजूने मतदान करणाऱ्या देशांमध्ये क्यूबा, उत्तर कोरियाचा समावेश आहे. तर दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भूटान, मालदिव आणि नेपाळने रशियाविरोधातील प्रस्तावाच्या बाजूने मत दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT