corona updates
corona updates 
ग्लोबल

भारतातील कोरोना रुग्णवाढीने जगातील गरीब देशांना चिंता

सकाळ डिजिटल टीम

जिनिव्हा - भारतातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या रुग्णवाढीचा परिणाम जगातील गरीब देशांच्या लसीकरणावर होत असल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. जगभरात गरीब देशांना लशीचे जवळपास 9 कोटी डोस पुरवण्यावर याचा परिणाम झाला आहे. भारतात नवीन रुग्णांची संख्या अचानक वाढल्यानं पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देशातील गरज पूर्ण करण्यासाठी निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरीब देशांमध्ये लसीकरणाच्या प्रयत्नाला फटका बसू शकतो. संयुक्त राष्ट्रांकडून कोव्हॅक्स सुविधेअंतर्गत गरीब देशांना लस उपलब्ध करून दिली जात आहे. यामध्ये जवळपास 92 देशांचा सहभाग आहे. देशात एस्ट्राझेनका, ऑक्सफर्डच्या लसीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. भारताने इतर देशांना पुरवण्यात येणारी लस रोखण्यात आल्याचं वृत्त गुरुवारी फेटाळून लावलं होतं. भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत असून केंद्र सरकार आता एस्ट्राझेनकाची लस इतर देशांनी देणार नाही अशी माहिती समोर आली होती. रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलं होतं की, देशातील लसीकरणासाठी भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, लशीची निर्यात रोखण्यात आलेली नाही, मात्र इतर देशांना लस पुरवठा हा देशातील लसीकरण मोहिम आणि गरज यांची समीक्षा केल्यानंतरच सुरु केला जाईल असं म्हटलं होतं. परदेशात लस निर्यात करण्याचा निर्णय हा देशांतर्गत लस निर्मिती किती होते यावर अवलंबून असेल. सरकारचे प्राधान्य देशातील लोकांना लसीकरण करणं हे आहे. देशात लस निर्मितीची क्षमता वाढली आहे आणि दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आली आहे. सरकार दोन महिन्यांनी समीक्षा केल्यानंतर इतर देशांना लस पुरवठा कऱण्याबाबत निर्णय घेईल. 

जगातील अनेक देशांना सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेचा फटका बसत आहे. सर्वात वाईट अवस्था ब्राझीलची असून गेल्या 24 तासात ब्राझीलमध्ये 97 हजार 586 नवीन रुग्ण आढळले. तर दिवसभरात 2 हजार 639 लोकांचा मृत्यूही झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून एका दिवसात नवीन रुग्ण आढळल्याची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोनाचा कहर सर्वाधिक असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. 

जगभरात गेल्या 24 तासात 6 लाख 22 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दहा हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगात आतापर्यंत 12 कोटी 60 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 27 लाख 67 हजार जणांनी जीव गमावला आहे. सध्या जगात सक्रीय रुग्णांची संख्या 2 कोटींहून अधिक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT