India Farmer Protest,PM Trudeau
India Farmer Protest,PM Trudeau  
ग्लोबल

कॅनडाच्या पंतप्रधानांना भारताने शिकवला धडा; शेतकरी आंदोलनाला समर्थन देणं भोवलं

सकाळ ऑनलाईन टीम

Canada PM Trudeau Comment On India Farmer Protest :  नव्या कृषी कायद्याच्या विरोधात मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला वेगवेगळ्या क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. परदेशातील काही दिग्गजांनी देखील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचाही समावेश होता. मात्र त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भारत-कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध ताणले जाणार असल्याचे समोर येत आहे. दोन्ही देशांत होणारी उच्च स्तरिय बैठक भारताने स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.   

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रिवा गांगुली दास आणि कॅनडाचे समकक्ष अधिकारी यांच्यात मंगळवारी एक बैठक पार पडणार होती. या बैठकीला भारताने स्थगिती दिली आहे. नियोजित तारखेत बैठक शक्य नाही, असे कारण भारताने दिले आहे. मात्र याचा संबंध कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्र्ड्रो यांच्या वक्तव्याशी जोडला जात आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांनी शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या 551 व्या जयंतीनिमित्त एक व्हिडिओ शेअर केला होता.

यामध्ये त्यांनी मोदी सरकारविरोधात मैदानात उतरलेल्या शेतकऱ्यांना समर्थन दिले होते. भारतात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावर चिंता व्यक्त करुन अधिकारासाठी शांतीपूर्ण आंदोलन करणाऱ्याच्या देश पाठिशी असेल, असे पंतप्रधान ट्रूड्रो म्हणाले होते. द्विपक्षीय बैठक स्थगित करण्यापूर्वी मागील आठवड्यात  भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी कोविड-19 संदर्भातील  फ्रेंकोइस-फिलिपद्वारा आयोजित केलेली समन्वय समूह बैठक अर्ध्यातून सोडली होती. 7 डिसेंबरच्या बैठकीपासून दूर राहण्याचे कारण देताना भारताने  'शेड्यूलिंग'चा दाखला दिला होता.  

भारतीय समुदायाचे जवळपास 16 लाख लोक कॅनडामध्ये वास्तव्यास आहेत. यात सर्वाधिक लोकसंख्याही पंजाबी लोकांची आहे. कॅनडामध्ये जवळपास  7 लाख इतकी लोकसंख्या शिख समुदायाची आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT