ग्लोबल

'एडन'च्या खाडीत मर्चंट शिपवरील हल्ल्यानंतर भारतीय नौदल अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'आयएनएस विशाखापट्टणम्' तैनात

भारतीय नौदलाच्या वतीने शनिवारी सांगण्यात आलंय की, एडनच्या खाडीमध्ये 'एमव्ही मार्लिन लुआंडा' शिपवर हल्ल्याची खबर मिळाली. त्यानंतर आयएनएस विशाखापट्टणम् तैनात करण्यात आलेलं आहे. त्यापूर्वी शिप मार्लिन लुआंडाकडून एक धोक्याचा संदेश पाठवण्यात आलेला होता.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः भारतीय नौदलाच्या वतीने शनिवारी सांगण्यात आलंय की, एडनच्या खाडीमध्ये 'एमव्ही मार्लिन लुआंडा' शिपवर हल्ल्याची खबर मिळाली. त्यानंतर आयएनएस विशाखापट्टणम् तैनात करण्यात आलेलं आहे. त्यापूर्वी शिप मार्लिन लुआंडाकडून एक धोक्याचा संदेश पाठवण्यात आलेला होता.

भारतीय नौदलाने सांगितलं की, २६ जानेवारी रोजी रात्री 'मार्लिन लुआंडा'वरुन धोक्याचा कॉल मिळाला होता. त्यावरुन एडनच्या खाडीत आयएनएस विशाखापट्टणम् तैनात करण्यात आलं.

नौदलाने पुढे सांगितलं, संकटग्रस्त मर्चंट वेसलला मदत पोहोचविण्यात येतेय. आयएनएस विशाखापट्टणम् याद्वारे अग्मिशमन उपकरणं तैनात करण्यात आलेली आहेत.

मर्चंट शिपवर २२ भारतीय आणि एक बांगलादेशी चालक असल्याची माहिती आहे. समुद्रातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं नौदलाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे.

द गार्डियनच्या दाव्यानुसार, तेल जहाजावरील हल्ल्याची जबाबदारी येमेनच्या हुथी बंडखोरांनी स्वीकारली आहे. हुथीचे प्रवक्ते याह्या सारिया यांनी एका निवेदनात म्हटलंय की, आमचा प्रहार थेट होता. युनायटेड स्टेटनेही एमव्ही मार्लिन लुआंडावरील हल्ल्याची पुष्टी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

Latest Marathi News Live Update : बीडमधील गेवराई शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घर जळून खाक

पंतप्रधान मोदींची 12 वर्षे पूर्ण! फडणवीस-चव्हाणांनी मांडला विकास आणि राष्ट्रनिर्मितीचा लेखाजोखा; ‘नव्या भारताची’ दिशा सांगितली

SCROLL FOR NEXT