US Visa Fee Increase esakal
ग्लोबल

US Visa : अमेरिकेला जाण्याचा विचार करताय? मग, आधी ही बातमी वाचा; परराष्ट्र विभागानं घेतलाय मोठा निर्णय

अमेरिकेला जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

Balkrishna Madhale

परराष्ट्र विभागाच्या या निर्णयामुळं भारतीय विद्यार्थी आणि पर्यटकांना महागाईचा भार सोसावा लागणार आहे.

US Visa Fee Increase : अमेरिकेला जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं 'व्हिसा' शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय.

काही नॉन इमिग्रंट व्हिसावर (Non Immigrant Visa) हे शुल्क वाढवण्यात आलंय. परराष्ट्र विभागाच्या या निर्णयामुळं भारतीय विद्यार्थी आणि पर्यटकांना महागाईचा भार सोसावा लागणार आहे.

अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व्हिसाच्या शुल्कात अमेरिकेनं 25 डॉलर्सची वाढ केली असून सध्याच्या चलन दरानुसार, आता एका विद्यार्थ्याला 15 हजार 400 रुपये मोजावे लागणार आहेत. ही शुल्कवाढ 30 मेपासून अंमलात येणार आहे.

नवीन दर 30 मे पासून लागू

यूएस स्टेट डिपार्टमेंटनं जारी केलेल्या निवेदनानुसार, बिगर स्थलांतरित व्हिसासाठी शुल्काचे वाढलेले दर 30 मे 2023 पासून लागू होतील. या व्हिसांमध्ये व्हिजिटर, टुरिस्ट व्हिसा, स्टुडंट व्हिसा आणि एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा इत्यादींचा समावेश आहे. व्हिसा शुल्क श्रेणीबद्ध पद्धतीनं वाढवण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानं व्हिसा शुल्कवाढीची घोषणा केली असून त्यात विविध श्रेणीतील व्हिसांचे शुल्क वाढवण्यात आलं आहे. याचा फटक अमेरिकेत उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बसणार आहे.

विद्यार्थ्यांना आता व्हिसासाठी 160 डॉलर्सऐवजी 185 डॉलर्स मोजावे लागणार आहेत. त्याच वेळी व्यापारी, गुंतवणूकदार आणि विशेष व्यवसाय असलेल्या अर्जदारांसाठी शुल्क 16,785 रुपयांवरून 25,792 रुपये करण्यात येणार आहे. रविवारच्या विनिमय दरानुसार भारतीय रुपयांत ही रक्कम 15 हजार 400 रुपये होते. या शिवाय इतर श्रेणीतील व्हिसांचे शुल्कही वाढवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अभिषेक शर्मा सलामीला येणार? प्रकृतीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर...

Thane News: ठाणेकरांना आनंदाची बातमी! नवे ५०० खाटांचे रुग्णालय सुरू होणार, कुठे अन् सुविधा काय? जाणून घ्या

अक्षयासोबत लग्न झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला? हार्दिक जोशीने सांगितली सगळ्या नवऱ्यांची व्यथा

राष्ट्रपती भवनातील जेवणात गुजराती चवीचा मान... साध्या बटाट्यातून राजेशाही स्वाद बनलेलं 'बटाटा नू शाक' आहे तरी काय?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील मांजरीत बिबट्याची दहशत कायम

SCROLL FOR NEXT