ग्लोबल

Video : अमेरिकेनंतर आता पोलंडमध्ये भारतीयावर वर्णद्वेषी टिपण्णी

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकेपाठोपाठ आता युरोपमध्ये भारतीय नागरिकावर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेसंबधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, वाढत्या वर्णद्वेषांच्या घटनांमुळे भारतीयांमध्ये संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये स्वतःला यूएसचा नागरिक म्हणवणारा व्यक्ती भारतीय व्यक्तीला पैरासाइट (परजीवी) आणि जेनोसाइडर (नरसंहार करणारा ) असं संबोधताना दिसून येत आहे. पोलंडमधील या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या भारतीय नागरिकाची ओळख अद्याप पटलेली नसून, व्हिडिओमध्ये भारतीय व्यक्ती संबंधित व्यक्तीला विरोध करता दिसत आहे. तसेच तु हा व्हिडिओ का बनवत आहे? असा प्रश्न भारतीय नागरिक या व्यक्तीला विचारता ऐकू येत आहे. दरम्यान या दोन व्यक्तीमध्ये नेमका वाद कोणत्या कारणामुळे झाला याचं नेमकं कारण समोर आलेले नाही. तसेच या प्ररकरणी अद्यापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

पोलंड फक्त पोलिश लोकांसाठी

हा व्हिडीओ बनवणारा अमेरिकन नागरिक तुम्ही आमच्या जातीचा नरसंहार करत आहात, तुम्ही पोलंडमध्ये का आहात? असा प्रश्न विचारत असून तुम्ही आमच्या पोलंडवर आक्रमण करू शकता असे तुम्हाला वाटते का? तुमचा स्वतःचा देश आहे, तुम्ही तिथे का जात नाही? असा सवाल करत पोलंड फक्त पोलिश नागरिकांसाठी असून तुम्ही पोलिश नसल्याचे म्हणत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT