britain
britain 
ग्लोबल

ब्रिटनचे जहाज इराणच्या ताब्यात; भारतीय नागरिकाचाही समावेश

वृत्तसंस्था

दुबई : इराणने ब्रिटनचे ऑईल टँकर व काही जहाजे जप्त केल्याने तणावामध्ये वाढ झाली आहे. होरमुज खाडीक्षेत्रामध्ये इराणने जहाजे जप्त केल्याने वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी ब्रिटनचे एक तेलवाहू टँकर आणि काही मालवाहू जहाजे जप्त केली आहेत. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत ही माहिती दिली. इराणचे रिव्होल्यूशनरी गार्डनी ही कारवाई केली. युकेचा झेंडा असलेले स्टेना इम्पेरो या तेलवाहू जहाजाला आंतरराष्ट्रीय सीमेमध्ये असताना हेलिकॉप्टर आणि चार जहाजांच्या मदतीने घेरण्यात आले. यानंतर या जहाजावर ताबा घेण्यात आला. या टँकरमध्ये एकूण 23 कर्मचारी असून यामध्ये एका भारतीय नागरिकही आहे.

इराणच्या गार्डनी त्यांच्या वेबसाईटवरही ही माहिती दिली आहे. यामध्ये सांगितले की, या जहाजाला आंतरराष्ट्रीय जलमार्ग कायदे न पाळल्याने जप्त करण्यात आले आहे. या जहाजाला इराणच्या बंदरावर ठेवले जाणार आहे. ब्रिटनचे सरकार किंवा जहाजाच्या कंपनीचा अद्याप जहाजाशी संपर्क झालेला नाही. इराणने जर लवकरात लवकर जहाज सोडले नाही तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आमचे राजदूत इराणसोबत संपर्कात आहेत, असे ब्रिटनच्या मंत्र्यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT