Zelensky Gold Tea Sakal
ग्लोबल

भारतातला शुद्ध सोन्याचा चहा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना समर्पित

भारतात पहिल्यांदाच शुद्ध २४ कॅरेट सोन्याचा चहा उपलब्ध झाला असून याची किंमत अडीच लाख रुपये किलो आहे.

वैष्णवी कारंजकर

सोन्याच्या चहाबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हा २४ कॅरेट सोन्याचा चहा खिशाला अगदी खरवडून काढणारा आहे. पण तरीही हौशी लोकांना जर हा चहा घ्यायचा असेल तर त्यासाठी दुबईलाच जावं लागत होतं. पण आता हा चहा भारतातच उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या चहाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचं नाव देण्यात आलं आहे. (India's first Pure Gold Tea)

आसामचे चहाचे व्यापारी रणजित बरुआ यांनी हा चहा भारतात आणला आहे. २४ कॅरेट सोन्याच्या या चहाची किंमत आहे अडीच लाख रुपये किलो. या चहाचा एक घोट घेताच तुम्हाला या चहाचा एक वेगळाच अनुभव येईल.

काय आहेत या चहाची वैशिष्ट्ये?

स्वर्ण पोनम ह्या सुवर्ण चहामध्ये खाण्यायोग्य २४ कॅरेट सोन्याच्या पातळ पापुद्र्यांचा वापर करण्यात आला आहे. या चहामध्ये वापरण्यात आलेली चहाची पावडरही खास काळ्या चहाच्या पानांपासून बनलेली आहे. हा विशेष चहा आसामचे चहा तज्ज्ञ आणि व्यापारी रणजित बरुआ यांनी तयार केला आहे. त्यांनी युरोपात चहा विकला आणि त्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली.

आसाममधल्या या दुर्मिळ काळ्या चहामध्ये मध, गूळ आणि कोको पावडर मिसळलेली आहे. चहाच्या कोवळ्या पानांपासून ही पावडर बनवली जाते. शुद्ध स्वरुपातल्या सोन्याचे पापुद्रे असलेला हा भारतातला पहिला चहा आहे. स्वर्ण पोनम ह्या चहाच्या १०० ग्रॅमच्या पुड्याची किंमत २५ हजार रुपये आहे.

हा चहा २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या निमित्ताने विक्रीसाठी आणण्यात आला आहे.

बरुआ यांनी या चहाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचं नाव दिलेलं आहे. रशियाच्या आक्रमणाविरोधात लढताना झेलेन्स्की यांनी दाखवलेल्या शौर्य आणि साहसाचा सन्मान म्हणून हे नाव देण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT