Ebrahim Raisi died 
ग्लोबल

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Iran President Ebrahim Raisi died: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे.

कार्तिक पुजारी

तेहरान- हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री यांचा देखील मृत्यू झाला आहे. इराणसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही तासांपासून रईसी यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता होते. त्याचा शोध सुरु होता.

बचावपथकाला अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आढळून आले होते. त्यानंतर इब्राहिम रईसी आणि त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या इतरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे त्यांच्या बचाव कार्यात अडथळा येत होता. अखेर त्याचे हेलिकॉप्टर सापडले, पण या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

इराणचे अध्यक्ष अझरबैजान येथे एका धरणाचे उद्घाटन केल्यानंतर हेलिकॉप्टरमधून परत निघाले होते. त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यातील दोन हेलिकॉप्टर आपल्या निश्चित स्थळी पोहोचले. पण, तिसरे विमान पोहचले नाही. हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर ३० मिनिटात त्याचा संपर्क तुटला होता. प्रयत्न केल्यानंतरही हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर बचावपथक रवाना करण्यात आले होते.

रविवारी रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. त्यानंतर गेल्या १० तासापासून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. बचावपथक रवाना करण्यात आले होते, पण जाड धुक्यांमुळे मदत कार्यात अडथळा येत होता. ड्रोन्सची देखील मदत घेण्यात आली होती. डोंगर भागात हा अपघात झाला होता. याठिकाणी रात्रीच्या ठिकाणी तापमान खूप कमी असते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत बचाव मोहीम राबवण्यात आली होती.

युरोपीयन यूनियनने देखील बचावकार्यात सहभाग घेतला होता. रॅपिड मॅपिंग सर्व्हिस सक्रिय करण्यात आली होती. यामुळे तंतोतत स्थितीची माहिती मिळत असते. याशिवाय, इराणने तुर्कीला मदत मागितली होती. नाईट व्हिजन आणि रेस्क्यू हेलिकॉप्टर तुर्कीकडून पुरवण्यात आले होते. याशिवाय सौदी अरेबियाने देखील मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, इराणचे अध्यक्ष आता या जगात नसल्याचं समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?

IND vs PAK T20 WC: इशान किशनची फटकेबाजी, भारताने उभे केले सर्वात मोठे लक्ष्य; पाकड्यांनी ६ स्पिनर्स वापरले, तरीही...

Mulund: २ कोटींची भरपाई, सरकारी नोकरी अन्...; मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या रामधनींच्या कुटुंबियांच्या मागण्या काय?

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT